Benefits of Olive Oil: मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ते तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी ऑलिव ऑइल उपयुक्त; इथे पहा त्याचे 6 आरोग्यदायी फायदे

सेलिब्रिटीयाच तेलाचा वापर करतात आणि  डाइट करतानासुद्धा  या तेलाचा वापर करण्यास सांगितले जाते.पण असे का हे आपल्यातील बऱ्याच जणांना माहित नसणार हे नक्की.ऑलिव ऑइल चे असे कोणते फायदे आहेत ज्यामुळे त्याचा वापर करण्यास सांगितले जाते ते आज आपण जाणून घेऊयात. 

Photo Credit : Pixabay

एखादा कुकिंग शो बघताना आपण ऑलिव ऑइल या तेलाच्या प्रकाराचा वापर जास्त पाहतो. सेलिब्रिटीयाच तेलाचा वापर करतात आणि  डाइट करतानासुद्धा  या तेलाचा वापर करण्यास सांगितले जाते.पण असे का हे आपल्यातील बऱ्याच जणांना माहित नसणार हे नक्की.केस, त्वचा, हाडे अशा अनेक गोष्टींवर ऑलिव ऑइल उपयुक्त ठरते .ऑलिव ऑइल चे असे कोणते फायदे आहेत ज्यामुळे त्याचा वापर करण्यास सांगितले जाते ते आज आपण जाणून घेऊयात. (Advantage Of Methi Seeds : मेथीच्या दाण्याचे 'हे' उपयुक्त फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?)

वजन कमी करते 

ऑलिव्ह ऑईल हे एक सुपर फूड आहे, जे तुमच्या शरीराला आवश्यक असं हेल्दी फॅट देतं. एका संशोधनानुसार, जर तुम्ही रोज ऑलिव्ह ऑईलचं सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहते.

केसांसाठी उत्तम 

ऑलिव्ह ऑईल तुमच्या डोक्याच्या त्वचेला पोषण देतात आणि केस मऊ ,निरोगी आणि चमकदार बनवतात.

हाय ब्लडप्रेशर 

ऑलिव्ह ऑईलमधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे यात फॅटी अॅसिड ओमेगा - 3 असते. ओमेगा-3 मुळे तुमचं ब्लड प्रेशर कमी होते,ज्यामुळे तुमचं हृदय हेल्दी राहते.

मधुमेहासाठी 

एका अभ्यासातून असे समोर आले की,ऑलिव ऑइल चा वापर केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.आणि रक्तशर्करा स्तर कमी होऊन मधुमेह कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.

हाडे बळकट करते

ऑस्टीओकॅल्सीन (Osteocalcin) हा ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारा घटक हाडं बळकट करतो. त्यामुळे जी लोकं नियमितपणे ऑलिव्ह ऑईलचं सेवन करतात त्यांना ऑस्टिओपोरॉसिस होण्याचा धोका नसतो.

लहानमुलांच्या त्वचेसाठी चांगले

ऑलिव ऑइल ने लहान मुलांच्या शरीराची मालिश केल्यास त्यांची त्वचा कोमल आणि मुलायम होण्यास मदत होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif