Delhi Air Pollution: खराब हवेमुळे तब्बल 8 वर्षांनी कमी होत आहे दिल्लीकरांचे आयुष्य; अहवालातील धक्कादायक खुलासा

हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे आणि वायू प्रदूषणाचा एक प्रमुख घटक आहे.

Air Pollution control Measures | (Pic Courtesy: PTI)

देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे (Delhi Air Pollution) जनता हैराण झाली आहे. आता त्याचे गंभीर परिणामही दिसू लागले आहेत. एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स 2024 च्या अहवालानुसार, दिल्लीतील वायू प्रदूषण तेथील रहिवाशांचे सरासरी आयुर्मान कमी करत आहे. दिल्ली हे उत्तर भारतातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. शिकागो युनिव्हर्सिटीच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट (EPIC) च्या अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवलेल्या मानकांच्या तुलनेत, दिल्लीत राहणारे 1.8 कोटी लोक सरासरी 11.9 वर्षे आयुष्य गमावण्याच्या मार्गावर आहेत. वायू प्रदूषणामुळे हे घडत आहे.

भारताच्या स्वतःच्या राष्ट्रीय मानकांनुसार, प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास, रहिवाशांचे आयुर्मान 8.5 वर्षांनी कमी होऊ शकते. भारताची राजधानी आणि देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

मात्र, अहवालात असेही म्हटले आहे की जर भारताने त्याचे पीएम 2.5 (2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे हवेतील कण) राष्ट्रीय बेंचमार्कप्रमाणे पूर्ण केले तर, दिल्लीच्या रहिवाशांचे आयुर्मान 8.5 वर्षांनी वाढू शकते. तसेच, जर ते डब्ल्यूएचओ मानकांशी जुळले तर दिल्लीतील रहिवाशांचे आयुष्य सुमारे 12 वर्षांनी वाढू शकते. (हेही वाचा: Mumbai Monsoon-Related Diseases: मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सुचना) 

पीएम 2.5 श्वसन प्रणालीमध्ये खोलवर प्रवेश करू शकते आणि श्वसनाच्या समस्या निर्माण करू शकते. हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे आणि वायू प्रदूषणाचा एक प्रमुख घटक आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, भारतातील वार्षिक पीएम 2.5 मानक 40 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटरवर सेट केले आहे, मात्र 40 टक्क्यांहून अधिक लोक या मर्यादेपेक्षा जास्त हवेत श्वास घेत आहेत. दरम्यान, जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो, तर 2022 मध्ये वायू प्रदूषणात 19.3 टक्के घट नोंदवली गेली आहे. बांगलादेशानंतर जगातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे सरासरी आयुष्य एक वर्षाने वाढले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif