Covid 19 Vaccination: पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम च देऊ शकतात कोविड 19 लसीकरणाचा अपेक्षित परिणाम; संशोधकांचा दावा
त्यामुळे वॅक्सिन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर देखील 30 मिनिटं एखादी फिजिकल अॅक्टिव्हिटी, व्यायाम करा. ही व्यायाम करण्याची सवय दुसरा शॉर्ट मिळेपर्यंत कायम ठेवा.
2020 या वर्षामध्ये कोरोना वायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. दरम्यान आता या वायरसचा धोका टाळण्यासाठी कोविड 19 लसीकरण मोहिमेला (Covid 19 Vaccination) सर्वत्र सुरूवात झाली आहे. भारतामध्येही पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून कोविड 19 लसीचा पहिला डोस देण्यास सुरूवात झाली आहे. येत्या काही काही दिवसांत ही लसीकरण मोहिम वाढवली जाणार आहे. त्यामुळे अनेकांना कोविड 19 वायरसच्या गंभीर धोक्यांपासून वाचवणं सुकर होईल. या लसीकरणामुळे शरीरात डोस तर दिला जाईल पण त्याचा प्रभाव वाढ्वण्यासाठी आपल्याला थॉडे विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अभ्यासातून पुढे आलेल्या गोष्टींमध्ये लसीकरणापूर्वी तुम्ही पुरेशी झोप घेणं (Sleep) आणि व्यायाम (Exercise) करणं या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्यास तुम्हांला सहाजिकच त्याचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात असा दावा केला जात आहे. Covaxin Risks: कोवॅक्सिन चे फायदे आणि दुष्परिणाम सांगणारी Fact Sheet भारत बायोटेक कडून जारी; पहा संपूर्ण यादी.
शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम असल्या शिवाय लस तुम्हांला पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याकडे लक्ष द्या. ताण तणाव- नैराश्य यासारख्या गोष्टी तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकतात. दरम्यान Journal Perspectives on Psychological Science मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, झोप आणि व्यायाम या दोन गोष्टी तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला मजबूत करतात.
येत्या काही दिवसांत जसजसा लसींचं उत्पादन वाढेल तशी आता लसीकरण केंद्र वाढवली जातील. तुम्हांला लस मिळण्याआधीच तुमचं झोपेचं चक्र बिघडलं असेल तर तुम्ही ते सुधारणं आवश्यक आहे. अभ्यासकांच्या मते लस घेण्यापूर्वी 24 तास त्यांनी योग्य व्यायाम आणि रात्रीची शांत झोप घेणं आवश्यक आहे. International Journal of Behavioral Medicineने देखील प्रसिद्ध केलेल्या अभ्यासामध्ये असा दावा केला आहे की ज्यांची लसीकरणापूर्वी 2 दिवस आधी झोप व्यवस्थित झाली आहे त्यांच्यामध्ये लसीचा प्रभाव अधिक चांगला जाणवला आहे.
झोप अपुरी झाल्यास शरीरात अॅन्टिबॉडीज निर्माण करण्याची रोगप्रतिकारक्षमता देखील मंदावते. त्यामुळे वायरसशी लढण्यासाठी पुरेशा अॅन्टीबॉडीज शरीरात नसतील तर फ्लूशी सामना करणं कठीण होते. तसेच झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटं आधी टीव्ही, मोबाईल पासून दूर रहा. झोपण्यापूर्वी भरपेट खाणं, कॅफिनयुक्त पेयं, पदार्थ, अल्कोहल टाळा.
झोपेसोबत व्यायामदेखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे वॅक्सिन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर देखील 30 मिनिटं एखादी फिजिकल अॅक्टिव्हिटी, व्यायाम करा. ही व्यायाम करण्याची सवय दुसरा शॉर्ट मिळेपर्यंत कायम ठेवा. वायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी दुसरा शॉर्ट देखील घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच शरीरात पूर्ण संरक्षण निर्माण करण्याची क्षमता वाढेल असे तज्ञांचं मत आहे.