COVID 19 In India: भारतात 203 नवे कोरोना रूग्ण; सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 3900 पार; 4 जणांचा मृत्यू
सध्या सर्वात जास्त कोरोना बाधित राज्य केरळ आहे. केरळ मध्ये 1435 सक्रिय रूग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (५०६), दिल्ली (४८३), गुजरात (३३८) आणि पश्चिम बंगाल (३३१) मध्ये सर्वाधिक रूग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. आज 2 जून दिवशी सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे अॅक्टिव्ह रूग्ण 3961 आहेत. अशी माहिती Ministry of Health and Family Welfare कडून देण्यात आली आहे. या वर्षी जानेवारीपासून देशात एकूण कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. ज्यामध्ये रविवारपासून चार मृत्यूची नोंद झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारपासून सक्रिय रुग्णांच्या संख्येत 203 नवीन रुग्णांची भर पडली आहे.
दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये रविवारपासून प्रत्येकी एका कोविड 19 मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीत 47 नवीन कोविड19 रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे दिल्लीत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 483 झाली आहे. केरळमध्ये, रविवारपासून 35 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 1435 झाली आहे. महाराष्ट्रात, 21 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 506 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये, 44 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 331 झाली आहे. Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या माहितीनुसार, पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशातील नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगवरून असे दिसून आले आहे की सध्याची वाढ ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे आहे, जे आतापर्यंत सौम्य स्वरूपाचे असल्याचे दिसून येते.
LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1, हे चार सब व्हेरिएंट आहेत. ज्यामध्ये पहिले तीन अधिक अधिक आढळत आहेत.
मे 2025 पर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) LF.7 आणि NB.1.8 कोविड सब व्हेरिएंटना देखरेखीखालील प्रकार म्हणून सूचीबद्ध केले आहे, एक पातळी खाली Variants of Concern / Interest म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.