Coronavirus: रुग्णालयाबाहेर Hydroxychloroquine क्निनिक ट्रायल करण्याबाबत US FDA कडून अमेरिकेला दिला इशारा
त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात, असेही या विभागाने म्हटले आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत हायड्रोक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर रुग्णालयाबाहेर केला जात आहे. हे औषध प्रामुख्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी वापरले जात आहे. यूएस अन्न आणि औषध प्रशासन (US Food and Drug Administration) विभागाने अमेरिकेला याबाबत गंभीर इशारा दिला आहे. क्लिनिकल ट्रायलसाठी हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर करणे अत्यंत धोकायादयक आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात, असेही या विभागाने म्हटले आहे.
वृत्तसंस्तथा सिन्हुआचा हवाला देत आयएएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, यूएस अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जर एजिथ्रोमाइसिन (Azithromycin) आणि क्यूटी प्रोलोंगिग औषधांसोबत हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन वापरुन उपचार करुन घेणाऱ्या रुग्णांना हॉदयाशी संबंधीत आजार निर्माण झाल्याचे अहवाल एफडीएकडे आहेत.
यूएस एफडीएने पुढे म्हटले आहे की, अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्स शिवायही या औषधांचा वापर करत असल्याची माहिती आमच्याकडे आहे. हृदय आणि किडणीशी संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांनी जर हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले तर, त्यांच्या आगोदरच असलेल्या आजारांमध्ये पुन्हा आणखी नव्या समस्यांची भर पडू शकते. किडणी आणि हृदय आदींशी संबंधित आजार अधिक वाढू शकतात. (हेही वाचा, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,258 कोरोना बाधितांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या 51,017 वर)
यूएस एफडीएने म्हटले आहे की, आम्ही कोविड 19 उपचार आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन औषधांशी संबंधीत संशोधन कायम ठेवणार आहे. अधिक संशोधनांती मिळालेली माहिती जनतेसमोर ठेवण्यात येईल.