Coronavirus: हात धुण्यासाठी सॅनिटायझर योग्य की साबण?

अर्थात व्हायरस रोखण्याची दोन्हीही गॅरेंटी देत नाहीत. पण, तुलनेत सॅनिटायझर आणि साबण बऱ्याच प्रमाणात निर्जंतुकीकरण करतात.

Coronavirus: Sanitizer or soap | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच सीओव्हीआयडी-19 (COVID-19) अवघ्या जगावर संकट बनून राहिला आहे. जगभरातील सर्व देशांतील सरकारे जनतेला काळजी घेण्यास सूचवत आहेत. भारतातही आणि महाराष्ट्रातही जनतेला हाच सल्ला दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे हात धुण्यासाठी सॅनिटायजर (Sanitizer) आणि साबण (Soap) यांपैकी अधिक योग्य काय असा सवाल विचारला जात आहे.