Coronavirus: 70 टक्के लोकांनी जरी Face Mask वापरला तरी आटोक्यात येईल कोरोना विषाणू महामारी- Study
सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) विरुद्ध लढा देण्यासाठी ‘लस’ (Vaccine) हीच शेवटची आशा असल्याचे डब्ल्यूएचओने (WHO) सांगितले आहे. गेले अनेक महिने सरकार लोकांना मास्क (Mask) वापरण्याचे आवाहन करीत आहे, मात्र लोकांच्या निष्काळजीपणा मुळेच आज इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) विरुद्ध लढा देण्यासाठी ‘लस’ (Vaccine) हीच शेवटची आशा असल्याचे डब्ल्यूएचओने (WHO) सांगितले आहे. गेले अनेक महिने सरकार लोकांना मास्क (Mask) वापरण्याचे आवाहन करीत आहे, मात्र लोकांच्या निष्काळजीपणा मुळेच आज इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आता, एका अहवालामधून खुलासा झाला आहे की, कमीतकमी 70 टक्के लोकांनी नियमितपणे फेस मास्क वापरले तर कोविड-19 साथीचा रोग थांबविला जाऊ शकतो. अभ्यासानुसार आपण कोणत्या मटेरीअलचा मास्क किती कालावधीसाठी वापरतो ही गोष्ट कोरोना विरुद्धच्या लढयामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे.
'फिजिक्स ऑफ फ्लुइड' (Physics of Fluids) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, 'फेस मास्क' या विषयावरील अभ्यासांचे मूल्यांकन केले गेले आहे. तसेच, संसर्गित व्यक्ती इतर लोकांना संक्रमित करण्याचे प्रमाण कमी करेल की नाही, यावर महामारीविज्ञानाच्या अहवालांचा आढावा घेण्यात आला आहे. अभ्यासात म्हटले आहे की, अंदाजे 70 टक्के कार्यक्षमता असलेले सर्जिकल मास्कसारखे अत्यंत प्रभावी फेस मास्क, जर 70 टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी घातले असते तर कोरोनाचे प्रमाण कमी करता आले असते.’
अभ्यासाच्या संशोधकांमध्ये 'नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर' चे संजय कुमार यांचाही समावेश होता. कुमार म्हणाले की, अगदी चांगला मास्क नाही पण सामान्य कपड्याने जरी तोंड झाकले तरी संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, फेस मास्क फंक्शनमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती बोलते, गाते, शिंकते, खोकते किंवा अगदी श्वास घेते तेव्हा नाक आणि तोंडातून बाहेर पडणाऱ्या फ्लूइड थेंबांवर रोख लावता येऊ शकते. मात्र यामध्ये फ्लूइड थेंबांचा आकारही महत्वाचा आहे. (हेही वाचा: रशियाची Sputnik V लस ठरली 95 टक्के प्रभावी; जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार वितरण, जाणून घ्या किंमत)
हायब्रिड पॉलिमर मटेरियलपासून बनविलेले फेस मास्क एकाच वेळी चेहरा थंड ठेवण्यासोबतच उच्च कार्यक्षमतेने कण फिल्टर करू शकतात. कारण यामध्ये वापरले जाणारे फायबर्स मास्कच्या खालून उष्णता बाहेर टाकतात. विश्लेषणाच्या आधारे, संशोधकांनी सर्जिकल मास्कसारख्या कार्यक्षम फेस मास्कच्या सतत वापराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)