Coronavirus: कोरोना व्हायरस मराठी माहिती पुस्तिका पीडीएफ इथे पाहा, डाऊनलोड करा
ही माहिती एका पुस्तिकेच्या रुपात देण्यात आली आहे. आपणही कोरोना व्हायरस माहिती पुस्तिका पीडीएफ आपण इथे ऑनलाईन पाहू शकता आणि डाऊनलोडही करु शकता.
Coronavirus Marathi PDF: कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजे नेमके काय? कोविड 19 (COVID 19) विषाणून मानवी शरीरात नेमके काम कसे करतो? त्याची लक्षणं काय? त्याच्यारवर उपाय आणि उपचार आहे का? या विषाणूची नेमकी व्याप्ती किती? या प्रश्नांसह कोरोना व्हायरस विषाणूबाबत संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने उपलब्ध करुन दिली आहे. ही माहिती एका पुस्तिकेच्या रुपात देण्यात आली आहे. आपणही कोरोना व्हायरस माहिती पुस्तिका पीडीएफ आपण इथे ऑनलाईन पाहू शकता आणि डाऊनलोडही करु शकता.
कोरोना व्हायरस मराठी माहिती पुस्तिका पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच ही माहिती पुस्तिका ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
महत्त्वाचे असे की, कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी सोशळ मीडियाच्या माध्यमातून खास करुन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक लोक अनेक उपाय सूचवत आहेत. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही उपाय स्वत:च्या इच्छेने करणे हे जीवावर बेतू शकते. त्यामुळे कोणत्याही आणि कितीही महत्त्वाच्या व्यक्तीने कोरोना व्हायरस उपचारांबाबत भाष्य केले तरी, जोपर्यंत डॉक्टर सूचवत नाहीत, तोपर्यंत कोणत्यीह प्रकारची औषधं स्वत:च्या इच्छेने घेणे चुकीचे आहे. ते आरोग्यवर बेतू शकते. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (हेही वाचा, भारत देश कोरोनामुक्त कधी होणार? देशातील Lockdown महत्त्व आलेखांच्या माध्यामातून समजून घेत जाणून घ्या COVID-19 मधून आपली कधी पर्यंत होऊ शकते सुटका?)
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (1 एप्रिल 2020) रोजी राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या ही 322 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणाचा विचार करता आजही महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे अद्यापही हे संकट आपण नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत. राज्यातील जनतेने असेच सहकार्य सुरु ठेवावे, आपण या संकटावर नक्की मात करु, असेही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात गेल्या 24 तासात 386 नव्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आता 1637 इतकी झाली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 132 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे.