Omicron Sub-Variant XBB: सावधान! कोरोनाचं संकट टळलेलं नाही; ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हॅरिएंट आला, तामिळनाडूसह 'या' राज्यांमध्ये वाढत आहेत रुग्ण

या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर आहे, जिथे 175 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Omicron | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Omicron Sub-Variant XBB: ओमिक्रॉन (Omicron) च्या सब-व्हेरियंट XBB मुळे कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. XBB.3 उप-प्रकारामुळे सिंगापूरमध्ये कोविड संसर्गामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हे भारतासाठीही धोक्याचे ठरत आहे. आत्तापर्यंत, देशातील 9 राज्यांमध्ये XBB ची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये तामिळनाडू अव्वल आहे.

दरम्यान, 23 ऑक्टोबरपर्यंत भारतात एक्सबीबीची 380 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर आहे, जिथे 175 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ 103 प्रकरणांसह पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. ओमिक्रॉनच्या या उप-प्रकारचे पहिले प्रकरण बंगालमध्येच नोंदवले गेले होते. (हेही वाचा -Sudden Cardiac Arrest Awareness Month: भारतात हृदयविकाराच्‍या झटक्याच्‍या प्रमाणात वाढ होण्‍यामागे अनारोग्‍यकारक जीवनशैली व तणाव कारणीभूत; पहा हेल्दी हार्ट साठी Cardiologist ने दिलेल्या टीप्स)

XBB उप-प्रकाराचा या राज्यांमध्ये प्रसार -

तमिळनाडू आणि बंगाल व्यतिरिक्त, ओडिशा (35), महाराष्ट्र (21), दिल्ली (18), पुद्दुचेरी (16), कर्नाटक (9), गुजरात (2) आणि राजस्थान (1) मध्ये देखील XBB संसर्ग पसरला आहे. आतापर्यंत आढळलेल्या 380 प्रकरणांपैकी XBB.3 उप-प्रकार 68.42 टक्के आहे. XBB.2 साठी प्रकरणे 15 टक्के आहेत आणि XBB.1 साठी 2.36 टक्के आहेत. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

WHO व्यक्त केली चिंता -

डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनीही कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सौम्याच्या मते, XBB प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला संसर्गाचा बळी बनवू शकतो. यासोबतच काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचे 300 हून अधिक उप-प्रकार चिंतेचा विषय आहेत. यामध्येही XBB प्रकार अधिक घातक आहे.