थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घ्या

मात्र या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाय केले जातात. खासकरुन स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर या दिवस केल्याचे दिसून येते.

Peanuts (Photo Credits-File Image)

थंडीचे दिवस जवळ आले की आरोग्यासंबंधित विविध समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मात्र या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाय केले जातात. खासकरुन स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर या दिवस केल्याचे दिसून येते. तर थंडीत शेंगदाणे खाण्याचे फायदे असून त्यामधून आपल्या शरीराला प्रोटीन, ओमेगा-3,ओमेगा-6, फायबर आणि विटामिन ई सारखे तत्व मिळतात. हे सर्व तत्व आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरत थंडीच्या दिवसात शरीरात उब कायम राहण्यास ही मदत करतात.

शेंगदाण्यात प्रोटीन अधिक असल्याने ते शारिरीक वृद्धीसाठी उपयुक्त ठरते. तसेच जर तुम्हाला दूध पिणे बहुधा पसंद नसल्यास शेंगदाणे हा त्याऐवजी उत्तम पर्याय आहे. शेंगदाण्यांमधून पोषक तत्वांसोबतच हृदयासंबंधित होणारे आजार कमी होतात. मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेडेट फॅट शेंगदाण्यात असल्याने त्याचा हृदयासाठी फायदा होतो. शरीरामधील हानिकारक कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्याचसोबत मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा शेंगदाणे आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाल्ल्यास त्यांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी मदत होते.(आला थंडीचा महिना, त्वचा सांभाळा; या साध्या Winter Skin Care Tips वापरा आणि रहा हेल्दी)

त्याचसोबत शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट जरी असले तरीही वजन कमी करण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि फायबर मुळे वजन कमी होते. त्याचसोबत शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. गर्भवती महिलांनी शेंगदाणे खाणे फायद्याचे मानले जात असून त्यामध्ये फोलेट नावाचे तत्व असून ते शरीरातील पेशींचे विभाजन करण्यास मदत करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif