किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या!

किवी या फळाचे प्रथम उत्पादन चीन येथे घेण्यात आले. त्यानंतर हे फळ सर्वत्र प्रसिद्ध होऊन आता लोकल बाजारात सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येते. तर किवी फळ खाण्याचे आरोग्याला फायदे भरपूर आहेत.

किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या!
Kiwi Fruit (Photo Credits-Facebook)

किवी या फळाचे प्रथम उत्पादन चीन येथे घेण्यात आले. त्यानंतर हे फळ सर्वत्र प्रसिद्ध होऊन आता लोकल बाजारात सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येते. तर किवी फळ खाण्याचे आरोग्याला फायदे भरपूर आहेत. त्यानुसार यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ कमी करण्याचा गुणधर्म असल्याने कोलेस्टोरेलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत हृदयविकाराचे आजार असलेल्या व्यक्तींनी किवी फळ खाल्ल्यास उत्तम ठरेल. किवी हे फळ दिसायला चिकू सारखे असून आतमधून हिरव्या रंगाचे असते. या फळाची चव थोडी तुरट आणि गोड असली तरीही ते आरोग्याच्या संबंधित चयापयाच्या क्रियेसाठी लाभदायक मानले जाते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किवी फळ खाणे फायद्याचे आहे. कारण या फळाच्या आतील आणि बाहेरील साल ही गुणकारी मानली जाते. तसेच पाणी आणि पोटॅशिअमचे प्रमाण सुद्धा किवी फळात अधिक असल्याने अंगाला खाज येणे किंवा जळजळ होणे कमी होते. व्हिटामिन सी सुद्धा या फळात असून ते अनेक रोगांपासून आपला बचाव करते. खासकरुन मलेरिया आणि डेंग्यू झालेल्या रुग्णांनी आजारपणात किवी फळ खाल्ल्याने त्याचे उत्तम फायदे दिसून येतात.(उपाशी पोटी कधीच खाऊ नका 'या' गोष्टी, आरोग्यावर परिणाम होईल)

दिवसभरातील थकवा दूर करायचा असल्यास किवी फळ खाणे योग्य बाब आहे. तसेच रक्तीमधील साखरेचे प्रमाण ही किवी फळ संतुलित राखते. किवी फळ खाणे हे आरोग्य तंदुरुस्त राखण्यासोबत सौंदर्य खुलवण्यास सुद्धा मदत करते. त्यानुसार जर तुमच्या चेहऱ्याललक काळे डाग असल्यास किवी खाल्ल्याने ते हळूहळू कमी होतात.

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2019 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).