Beauty Tips: मेकअप उतरविण्यासाठी चेह-यावर महागडे प्रोडक्टस लावण्यापेक्षा घरच्या घरी बनवा 'हे' पॅक

अशा वेळी तुम्ही घरच्या घरी घरगुती गोष्टींनी हा मेकअप काढू शकता ज्या तुम्हाला त्वरित उपलब्ध होतील.

Remove Make Up (Photo Credits: Pixabay)

सध्याच्या काळात वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने वापरून मेकअप (Make Up) करणे हा अनेक तरुणींचा, महिलांचा आवडीचा विषय बनलाय. कुठेही बाहेर जाताना, समारंभास जाताना छान नटून-थटून जाणे महिला अधिक पसंत करतात. म्हणून आपले सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी ते आपल्या चेह-यावर छान मेकअप करतात. मात्र ही उत्पादन जितकी महाग तितका तो मेकअप उतरविण्यासाठी लागणारी उत्पादनही तितकीच महाग असतात. कारण अॅडव्हान्स मेकअप उतरविण्यासाठी तितकेच कष्ट घ्यावे लागतात अन्यथा तुमच्या चेह-यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

मात्र दरवेळेला मेकअप उतरविण्यासाठी इतकी महागडी प्रोडक्ट घेणे सर्वांनाच परवडेल असे नाही. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी घरगुती गोष्टींनी हा मेकअप काढू शकता ज्या तुम्हाला त्वरित उपलब्ध होतील.

1. नारळाचे तेल

नारळाच्या तेलात अनेक पोषक घटक असतात. याचा उपयोग तुम्ही मेकअप काढण्यासाठी करु शकता. तसेच त्याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही. सावधान! जिममध्ये मेकअप लावून वर्कआऊट करणे पडेल महागात, चेह-यावर होतील 'हे' दुष्परिणाम

2. मध आणि कोरफड

मध आणि कोरफड याच्या मिश्रणाचा वापर करुन तुम्ही मेकअप उतरवू शकता. त्यासाठी एका वाटीत कोरफड आणि मध एकत्र करा. त्यात दोन चमचे तूप घाला. नंतर हे मिश्रण त्वचेला लावून छान मसाज करा. आणि काही वेळाने कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवून टाका.

3. दूध आणि दही

दूध आणि दह्याचा वापर करुनही तुम्ही मेकअप उतरवू शकता.

4. बदामाचे तेल

बदामाचे तेल वापरून तुम्ही चेह-यावरील मेकअप सोबत चेह-यावर चिकटलेली धूळ ही साफ करू शकता. तसेच हे तेल त्वचेच्या स्काल्प वरील धूळही अतिरिक्त स्कीन ही काढून टाकतो.

5. गुलाबपाणी

गुलाबपाण्याचा वापर करुनही तुम्ही मेकअप काढू शकता. तसेच या मुळे तुमच्या चेह-याला थंडगार आणि थोडं रिलॅक्स वाटेल.

Health Tips: उन्हाळ्यात 'या' गोष्टी करुन घ्या तब्येतीची काळजी Watch Video

त्यामुळे महागडी उत्पादने घेण्यापेक्षा तुम्ही हे झटपट घरगुती टिप्स नक्कीच ट्राय करु शकता. याचा तुमच्या शरीरावर काही विपरित परिणाम होणार नाही.