IPL Auction 2025 Live

चिंता वाढली! कोरोनानंतर इस्रायलमध्ये आढळला Florona नावाचा आजार; दोन व्हायरसचा संसर्ग, जाणून घ्या सविस्तर

देशातील 70 टक्के लोकसंख्येला बूस्टर डोस आधीच दिले गेले आहेत आणि आता जनतेला चौथा डोस दिला जाईल

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन प्रकाराने जगभरात हाहाकार माजवला आहे. आता इस्रायलमध्ये (Israel) एक नवीन आजार आढळून आला असून त्याचे नाव फ्लोरोना (Florona) आहे. असे सांगण्यात आले आहे की, कोरोनाव्हायरस आणि इन्फ्लूएंझा व्हायरसच्या दुहेरी संसर्गामुळे हा आजार उद्भवला आहे. इस्त्राईल वृत्तपत्र येडिओट अहरोनॉटच्या मते, या आठवड्यात एका गर्भवती महिलेला रबिन मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर तिच्यामध्ये दुहेरी संसर्ग आढळून आला. इस्त्राईलचे आरोग्य मंत्रालय हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे काही गंभीर आजार होऊ शकतो का नाही.

अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वरित रुग्णांचीही तपासणी सुरू केली आहे. रशिया टुडे (आरटी) वेबसाइटने डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले की, दुहेरी संसर्गाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती सध्या ठीक आहे आणि तिला शुक्रवारपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल. तिला लसीचा एकही डोस मिळालेला नव्हता. सध्या इस्रायलमध्ये कोरोना व्हायरससोबत इन्फ्लूएंझा व्हायरसचाही कहर माजला आशे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात इन्फ्लूएंझा झालेल्या 1849 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून अजूनही रुग्ण येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिना काही नवीन आजार किंवा नवीन प्रकार नाही. त्याला दुहेरी संसर्ग म्हटले जात आहे. यामध्ये, रुग्णाला कोविड-19 विषाणूसह इन्फ्लूएंझा व्हायरसचा संसर्ग होतो, ज्यामुळे तो कोविड-19 पेक्षा दुप्पट धोकादायक बनू शकतो. मार्च 2020 मध्ये जगात कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर प्रथमच असा संसर्ग दिसून आला आहे. इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामध्ये न्यूमोनिया, मायोकार्डिटिस सारखी अनेक गंभीर लक्षणे आहेत, ज्यामुळे कधीकधी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. (हेही वाचा: France मध्ये कोविड 19 रूग्णसंख्येमध्ये उच्चांकी वाढ; दिवसाला 2 लाख नवे रूग्ण आले समोर)

दुसरीकडे इस्रायलने कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सामना करण्यासाठी कोरोना लसीचा चौथा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 70 टक्के लोकसंख्येला बूस्टर डोस आधीच दिले गेले आहेत आणि आता जनतेला चौथा डोस दिला जाईल.