AIIMS Research Report: मृत व्यक्तीपासूनही होऊ शकते मूल; एम्सने संशोधनात केला दावा

अथेन्स, ग्रीस येथे आयोजित 26 व्या त्रैवार्षिक इंटरनॅशनल अकादमी ऑफ लीगल मेडिसिन परिषदेत या संशोधनाचा समावेश करण्यात आला.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

AIIMS Research Report: मृत व्यक्तीच्या शरीरातून काढलेले शुक्राणू (Sperm) साडे एकोणीस तास जिवंत राहू शकतात. याच्या मदतीने कोणतीही महिला आई बनू शकते, असं AIIMS भोपाळ येथे झालेल्या संशोधनात समोर आले आहे. एम्स भोपाळचे प्राध्यापक डॉ. राघवेंद्र कुमार विदुआ आणि त्यांच्या टीमने पोस्टमार्टम शुक्राणू पुनर्प्राप्तीवर अभ्यास केला आहे. यामध्ये शवविच्छेदनानंतर 125 मृत व्यक्तींच्या मृतदेहातून शुक्राणू काढण्यात आले आणि ते जतन करण्यात आले. यामध्ये 47.22 टक्के लोकांचे शुक्राणू जिवंत आढळले.

डॉ.राघवेंद्र कुमार यांनी सांगितलं की, मृत व्यक्तींवर अशा प्रकारचे संशोधन देशात प्रथमच एम्स भोपाळमध्ये करण्यात आले आहे. अथेन्स, ग्रीस येथे आयोजित 26 व्या त्रैवार्षिक इंटरनॅशनल अकादमी ऑफ लीगल मेडिसिन परिषदेत या संशोधनाचा समावेश करण्यात आला. (हेही वाचा -Cure For Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी; जगात प्रथमच सेल थेरपी उपचारानंतर डायबिटीज रुग्ण झाला बरा, चिनी शास्त्रज्ञांची कमाल)

डॉ. कुमार यांनी म्हटलं आहे की, हे संशोधन 2022 मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये विशेषत: 47.22 टक्के प्रकरणांमध्ये जिवंत शुक्राणू प्राप्त झाले होते, ज्याचा वापर IVF प्रक्रियेमध्ये केला जाऊ शकतो. या नव्या पद्धतीच्या पेटंटसाठी आयसीएमआरकडे अर्ज पाठवण्यात आला असून लवकरच पेटंट मिळण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif