Winter Skin Care Tips: 'हिवाळ्यात उजळ त्वचा हवी'? मग करा हे उपाय....
प्रत्येक ऋतू मध्ये आपल्या त्वचेला अधिक काळजीची गरज असते.
आपली त्वचा खूप संवेदनशील असते. हवामानील बदल आपल्या त्वचेला अजून संवेदनशील बनवते.प्रत्येक ऋतू मध्ये आपल्या त्वचेला अधिक काळजीची गरज असते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते,पायाला भेगा पडतात,ओठ फाटतात या समस्या आपल्याला होऊ नये त्यासाठी त्वचेची काळजी घेणे महत्वाची आहे. हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्वचेच्या समस्याही वाढतात. वयाच्या 25 ते 27 मध्ये लोक मॉइश्चरायझरशिवाय त्वचेवर चमक आणण्यात यशस्वी होतात, तेच वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना अनैसर्गिक मॉइश्चरायझर्सवर अवलंबून राहावे लागते.
कारण वाढत्या वयाबरोबर त्वचा नैसर्गिक तेल बनवू शकत नाही. यामुळे, कोलेजन आणि इलास्टिनचे उत्पादन देखील अनुक्रमे कमी होऊ लागते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात त्वचा कोरडी कोरडी पडते.या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय लाभदायक आहे. रासायनिक घटक असलेल्या क्रीम अधिक काळ वापरल्यामुळे आपली त्वचा खराब होते ते टाळण्यासाठी आत्तापासून नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण आपली त्वचा अधिक सुंदर बनवू शकतो.
*केळी, मलई आणि मधाची पेस्ट लावा
हिवाळ्यात, सामान्यतः प्रत्येक घरात सेंट्रल हीटिंग, ब्लोअर, रूम हीटर इत्यादींचा वापर केला जातो, ज्यामुळे खोलीतील ओलावा सुकतो, त्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि त्वचेवर दाणेदार होते. ते कमी करण्यासाठी पिकलेल्या आणि मॅश केलेल्या केळ्यामध्ये 1 टीस्पून दुधाची साय आणि 1 टीस्पून मध मिसळा आणि चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा तुमचा चेहरा उजळेल.
* आंघोळीनंतर त्वचेवर लैनोलिन मॉइश्चरायझर लावा.
त्वचा संवेदनशील आणि कोरडी असल्यास , आंघोळीनंतर तुमच्या ओल्या त्वचेवर लैनोलिन मॉइश्चरायझर लावा. हे मॉइश्चरायझरला पृष्ठभागावरील ओलावा पकडण्यास मदत करते. संपूर्ण हिवाळ्यासाठी हे करा, तुमची त्वचा कोरडी होणार नाही.
* गरम पाणी आणि साबण कमी वापरा
हिवाळ्यात कमी गरम पाणी वापरा ,साबण चा वापर टाळा . जर तुमच्या त्वचेला थंडीमुळे खाज येत असेल, तर डिटर्जंट नसलेल्या क्लीन्सरने उबदार शॉवर घ्या. आंघोळीनंतर तुमच्या त्वचेवर पेट्रोलियम जेली असलेले मॉइश्चरायझर लावा.
* सूर्यप्रकाशात जाणे टाळा
थंड हवेपासून त्वचेचे केले पाहिजे . घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित झाकणे आणि कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे गरजेचे आहे . पेट्रोलियम आधारित लिप बाम वापरा. पेट्रोलियम आणि सिरॅमाइड्स असलेली क्रीम्स त्वचेचे चांगले संरक्षण देतात.
*आहार
हिवाळ्यात त्वचेच्या सुरक्षेसाठी खाण्यावरही विशेष लक्ष देण्याची गरज असते. या ऋतूमध्ये ओमेगा ३ असलेल्या गोष्टी खाण आवश्यक आहे.आवश्यकतेनुसार ब्लूबेरी, पालक आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
* भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात आपण अनेकदा थंडीमुळे कमी पाणी पितो, त्यामुळे त्वचेला पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो, त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा डागांपासून मुक्त होते.