Mobile Phone Use in The Morning: सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल वापरता? 'हे' आहेत 5 वाईट परिणाम; घ्या जाणून
त्याची पाच कारणे आपण जाणून घेऊयात.
Mobile Phone Use in The Morning: आजच्या डिजिटल जगात, स्मार्टफोन हा आयुष्याचा अविभाज्य घटक (Smartphone Addiction) बनला आहे. ज्यामुळे आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्मार्टफोन पाहण्याची सवय असते. ज्याची सुरुवात अलार्म सेट करण्यापासून उद्भवते. अलार्म बंद केल्यानंतर अंथरूणात असतानाच मॅसेज पहाणे, सोशल मीडिया फीड चेक करणे यात आपण किमान अर्धातास घालवतो. सुरुवातीला ही समस्या वाटत नसली तरी सकाळी लवकर फोन वापरण्याची सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम (Smartphone Negative Effect)करू शकते. (हेही वाचा: PresVu Eye Drops: ईटीओडी फार्मास्युटिकलचा परवाना निलंबित, अनधिकृत जाहिरातींवर बंदी)
सकाळी स्मार्टफोन वापरण्याचे काही वाईट परिणाम:
मानसिक आरोग्यावर परिणाम होतो
चांगल्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ असते. जर तुम्ही सकाळी मॅसेज पहाणे, सोशल मीडिया फीड चेक करणे यात वेळ घालवला तर तुमच्या उर्वरित दिवसाच्या योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचू शकते. यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य वाढू शकते.
स्क्रीन व्यसन वाढू शकते
स्क्रीनचे व्यसन हे खरे आहे. सध्याच्या काळात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आजकाल सर्वांची स्मार्टफोनसाठीची ओढ वेगळ्याच स्तरावर पोहचली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची सवय सोडणे कठीण झाले आहे.
झोपेचे चक्र बिघडते
उठल्यानंतर लगेच फोन वापरल्याने तुमच्या झोपेच्या चक्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. स्क्रीन निळा प्रकाश उत्सर्जित करते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये मेलाटोनिन उत्पादनात व्यत्यय येतो. ज्यामुळे झोप लागणे कठीण होते. तुमच्या दृष्टीवर परिणाम होतो. फोनच्या अतिवापरामुळे तुमच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यामुळे डोळे कोरडे पडतात, जळजळ आणि डोकेदुखी होते.
आजारी होण्याचा धोका
आपल्यापैकी बहुतेकांना वॉशरूममध्ये फोन वापरण्याची सवय असते. परंतु असे केल्याने तुमच्या फोनवर घातक जीवाणू आणि रोग येऊ शकतात. ज्यामुळे फोन दूषित होण्याची शक्यता वाढते.
प्रोडक्टिव्हीटी कमी होणे :
फ्रेश असूनही काम करावेसे वाटत नाही, असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. तुम्हाला सक्रिय वाटत नाही आणि आणखी प्रोडक्टिव्हीटी कमी होऊ लागते. सकाळी उठून फोन वापरल्यामुळे कुठेतरी असे घडते. कारण तुमची अर्धी एनर्जी त्यात जाते.
हे कसे टाळायचे?
झोपेचे वेळापत्रक सेट करा:
किमान 6 ते 8 तास झोप ही गरजेची आहे. झोपण्याच्या एक तास आधी स्मार्टफोन वापरणे टाळा. सकाळीही तेच नियम पाळा. तुम्ही उठल्यानंतर किमान 1 तासानंतर तुमच्या फोन तपासू शकता.
आरोग्यावर लक्ष केंद्रित करा:
तुमचा फोन पाहण्याऐवजी, सकाळी तुमच्या शारीरिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. यात तुम्ही योग सराव करू शरकता. मॉर्निंग वॉक किंवा जिमला जाऊ शकता.
कुटुंबासोबत वेळ घालवा:
आपल्या कुटुंबाशी आणि प्रियजनांशी संपर्क साधा आणि सकाच्या वेळी त्यांच्याशी बोला. निरोगी राहण्यासाठी पौष्ठिक नाश्ता तयार करा.
या सूचना तुम्हाला चांगले आरोग्य आणि उत्पादकता वाढविण्यात मदत करू शकतात.