पाणीपुरी खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

घरी आपल्याला हवी तशी पाणीपुरी बनवून आपण त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतलात तर त्यातून तुमच्या आरोग्याला फायदाच होणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले, अथवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा पहिले नाव डोळ्यासमोर येते ते पाणी पुरीचे. कोणीही असो पाणीपुरीचे नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटते. देशात विविध नावांनी ओळखली जाणारी ही पाणीपुरी तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळते. बरेच लोक पाणीपुरी हेल्दी नसल्याने ती खाण्याचे टाळतात. मात्र हा पूर्णतः चुकीचा समज आहे. पाणीपुरी खाण्याचा आपल्या शरीराला बराच फायदा होतो. वजन कमी करण्यासाठीदेखील पाणीपुरीचा उपयोग होऊ शकतो. बाजारात मिळणारी पाणीपुरी ही अनेकदा स्वच्छतेच्या कारणामुळे खाण्याचे टाळले जाते, मात्र त्यापेक्षा घरी आपल्याला हवी तशी पाणीपुरी बनवून आपण त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतलात तर त्यातून तुमच्या आरोग्याला फायदाच होणार आहे. चला लर पाहूया काय आहेत पाणीपुरी खाण्याचे फायदे.

> अॅसिडिटी – पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी वाटलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिन्याचा वापर करतात. हे पाणी तुमचे पोट शांत ठेवण्यास मदत करतो आणि या पाण्यामुळे अॅसिडिटी समस्याही दूर होते.

> वजन कमी करणे – वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाण्याचा फायदा होतो, कारण या पाण्यात जे मसाले घातले जातात ते मसाले तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच हे पाणी बनवताना त्यात मिरची, लिंबू, हिंग आणि कच्चा आंबा या गोष्टी अवश्य घाला. शक्यतो गोड पाण्याचा वापर करू नका.

> तोंड येणे – पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी शक्यतो आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर करतात. हे मसाले तुम्हाला तोड आले असेल त्यावरील रामबाण उपाय आहेत.

> मळमळणे (नॉशिया) – कधी कधी कारण नसतानाही तुम्हाला मळमळ जाणवते किंवा चिडचिड, मूडस्विंग होतात ही समस्या दीर्घकाळासाठी राहिली तर नॉशिया येऊन कोणतीही गोष्ट खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पाणीपुरीची फार मदत होते. नॉशिया फील झाल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने लगेच व्यक्ती मूळ पदावर येऊ शकते.

पाणीपुरी ही शक्यतो दुपारच्या वेळी खावी. दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे खाणे यादरम्यान पाणीपुरी खाल्याने तुम्ही खाल्लेले अन्न हे चांगल्या प्रकारे पचते. त्यामुळे पोटाचे इतर विकार होत नाहीत. मात्र एकावेळी 5-6 पाणीपुरीपेक्षा जास्त पुरी खाणे शक्यतो टाळा.

पाणीपुरी शौकिनांसाठी एक अनोखा प्रयोग गुजरातच्या अहमदाबाद शहरात केला गेला आहे. इथे पाणीपुरी खाऊ घालण्याची एक वेंडींग मशीन लावण्यात आली आहे. या मशीनच्या मदतीने तुमच्या आवडीची पाणीपुरी तुम्ही खाऊ शकता. या वेंडींग मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप लावले आहेत. तुम्हाला ज्याप्रकारचे पाणी पाहिजे, जसे गोड, तिखट किंवा मिडियम हे एका बटनावर क्लिक करुन तुम्हाला मिळेल.