Good Morning Messages: सुप्रभात म्हणत सकारात्मकता, आनंद देणारे मराठमोळे Quotes, Wishes,Funny HD Images, GIF,WhatsApp Stickers शेअर करून मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या दिवसाची करा परफेक्ट सुरूवात
तुमच्यासोबतच परिवारातील इतर लोकांचा, मित्र मैत्रिणींचा, प्रिय व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात काही प्रेरणादायी, मजेशीर Good Morning Messages च्या माध्यमातून करा. funny Good Morning images, positive quotes, funny greetings, WhatsApp Stickers शेअर करायला विसरू नका.
Good Morning, शुभ सकाळ, शुभप्रभात... सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. पण अशा पस्थितीमध्येही आपल्याला संकटाचा सामना करणं भाग आहे. त्यासाठी दिवसाची सुरूवात सकारात्मक होणं गरजेचे आहे. जगभरातून कोरोना व्हायरसबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत आहेत. पण हे संकट परतवून लावण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. आपलं आयुष्य पुन्हा पुर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतू तो पर्यंत धीर, संयम राखणं अत्यावश्यक आहे. सध्या अनेकांना 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय दिला आहे. त्यामुळे त्यांचा वेळ कामात जातो पण ज्या व्यक्तींना बिनकामाचं घरात बसावं लागत आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक कठीण आहे. सोशल मीडिया, न्यूज चॅनल यांच्यामधून सतत बातम्यांचा, माहितीचा भडीमार होत असल्याने सकाजिकच नकारात्मक विचार, भीती, मनात बसते. पण आता यामधून मार्ग काढण्यासाठी तुम्हांला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्यापैकी अनेकांची दिवसांची सुरूवात मोबाईलवर व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम पाहून होते. मग तुमच्यासोबतच परिवारातील इतर लोकांचा, मित्र मैत्रिणींचा, प्रिय व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात काही प्रेरणादायी, मजेशीर Good Morning Messages च्या माध्यमातून करा. Funny Good Morning Images, Positive Quotes, Funny Greetings, WhatsApp Stickers पाहून, वाचून तुमच्यावरील ताण थोडा हलका होण्यासाठी मदत होईल.
भारतीयांना सकाळी शुभ सकाळ, सुप्रभात, गुड मॉर्निंगचे मेसेज शेअर करायला आवडतात. मग तुमच्या या सवयीने कुणाच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमेटणार असेल, कुणाचा दिवस एखादा सकारात्मक विचार पाहून, वाचून होणार असेल तर तुम्हांला हे खास मराठमोळे गुड मॉर्निंग मेसेज नक्की मदत करतील.
Good Morning Messages
WhatsApp Message Reads:
गोड माणसांच्या केवळ आठवणींनीही
आयुष्य कसं गोड बनतं
अन दिवसाची अशी गोड सुरूवात
नकळत ओठांवर गोड हास्य खुलवतं
शुभ सकाळ
WhatsApp Message Reads:
ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ सकाळ
WhatsApp Message Reads:
तुम्ही कोण आहात, यावर तुमचा आनंद अवलंबून नाही,
तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे.
शुभ सकाळ
WhatsApp Message Reads:
जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ द्यायच्या नाहीत..
अन्नाचा कण,
आणि आनंदाचा क्षण..
गुड मॉर्निंग
WhatsApp Message Reads:
लिहिताना जपावेत ते अक्षर मनातले
रडताना जपावेत ते पाणी डोळ्यातले
बोलताना जपावेत ते शब्द ओठातले
हसताना विसरावेत ते दु:ख जाणिवातले
गुड मॉर्निंग
आजकाल व्हॉट्सअॅप हे जगात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या मेसेजिंग अॅपवर व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही शुभेच्छा संदेश पाठवता येऊ शकतात. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही आवडीचा स्टिकर पॅक डाऊनलोड करून त्याच्याद्वारा मेसेज पाठवू शकता.
आपल्याकडे जी गोष्ट नाही आपण त्याचाच विचार करत बसतो आणि खिन्न होतो. आता थोडा वेळ काढा तुमच्याकडे जे आहे, जसं आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करा. आजपासून प्रत्येक दिवसाची सुरूवात एका चांगल्या, सकारात्मक विचाराने करा. रिकाम्या मिळालेल्या भरपूर वेळामध्ये इतके दिवस ज्यांच्याशी बोलायला, मेसेजला रिप्लाय करायला वेळ मिळत नव्हता त्यांच्याशी खूप बोला. कोरोनाला हरवायला माणसांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग असलं तरीही सोशल मीडिया डिस्टंसिंग नाही त्यामुळे ही मनामनातील अंतरं दूर करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)