Ramadan 2019 Iftar Special Food: मुंबई मधील मोहम्मद अली रोड वर 'इफ्तार' स्पेशल मेजवानीचा आनंद घेणार असाल तर हे 5 पदार्थ एकदा चाखायला हवेच!

मुंबईतील मोहम्मद अली रोड (Mohamad ali Road), भेंडी बाजार भागात रमजान स्पेशल (Ramadan Special) इफ्तार मेजवानीची चंगळ असते. लहानशा गल्ल्या-गल्ल्यांमध्ये अस्सल मोघलाई फूडचा आनंद घेता येतो.

Iftar Food (Photo Credits: Instagram)

Ramzan Special Iftar Food in Mumbai: रमजान (Ramzan) हा इस्लामिक कॅलेंडरमधील नववा आणि अत्यंत पवित्र समजला जाणारा महिना आहे. या महिन्यात अनेक मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच निर्जळी उपवास ठेवतात. दिवसभर अन्न, पाणी यांचं सेवन न करण्याचा दंडक असतो. संध्याकाळी 'इफ्तार'(Iftar)च्या वेळेवर दिवसभराचा उपवास सोडला जातो तर दुसर्‍या दिवशी पहाटेच्या वेळेपर्यंत अन्न, पाणी खाण्याची मुभा असते. इफ्तारनंतर अनेक चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येतो. मुंबईतील मोहम्मद अली रोड (Mohammad ali Road), भेंडी बाजार भागात रमजान स्पेशल (Ramadan Special) इफ्तार मेजवानीची चंगळ असते. लहानशा गल्ल्या-गल्ल्यांमध्ये अस्सल मोघलाई फूडचा आनंद घेता येतो. मग तुम्हीदेखील खवय्ये असाल तर मुंबईत कुठे आणि कोणत्या ठिकाणी इफ्तार स्पेशल रमजान फूडचा आनंद घेता येऊ शकतो हे नक्की पहा. Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा

मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली

सॅन्डहर्स्ट रोड पासून अगदी चालत तुम्ही 10-15 मिनिटात मोहम्मद अली रोडवर येऊ शकता. रमजानच्या काळात मोहम्मद अली रोड परिसरात इफ्तारच्या वेळेनंतर खास रमजान स्पेशल पदार्थांची स्ट्रीट फूडच्या स्वरूपात चव चाखता येते. स्ट्रीट फूड प्रमाणेच येथे काही हॉटेल्स आणि रेस्ट्रॉरंट्समध्ये इफतार स्पेशल पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची झुंबड उडते.

शालिमार चा फालुदा 

शालिमार हॉटेलमध्ये चिकन श्वार्मा, फालूदा, मोघलाई फूड ते फिरनी पर्यंत अनेक लज्जतदार पदार्थांची चव चाखता येऊ शकते. अनेक खवय्ये शालिमारमध्ये फक्त 'फालुदा' चाखण्यासाठी येतात.

Chinese-N-Grill ची नल्ली निहारी 

भेंडीबाजार परिसरात Chinese-N-Grill या हॉटेलमध्ये खास मोघलाई फूड प्रसिद्ध आहे. 'नल्ली निहाली', 'सीख कबाब' आणि कलेजी फ्राय या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

 सुलेमान उस्मान मिठाईवाला चे गोडाचे पदार्थ

मोहम्मद अली रोडजवळच सुलेमान उस्मान मिठाईवाला हे प्रसिद्ध दुकान आहे. तुमचं गोडाच्या पदार्थांवर विशेष प्रेम असेल तर सुलेमान उस्मान येथील गोडाचे पदार्थ, प्रामुख्याने मालपुवाचा विशेष आस्वाद घ्या. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज येथील गोडाच्या पदार्थांच्या प्रेमात आहेत.

फिरनी

फिरनी हा देखील गोदाचा एक पदार्थ आहे. मोहम्मद रोडवरील अनेक फूड स्टॉलवर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये फिरनी उपलब्ध आहेत. मातीच्या भांड्यामध्ये थंडगार फिरनी सर्व्ह केली जाते.

इफ्तारची वेळ पाहून संध्याकाळी या भागात खास रमजान स्पेशल मेजवानीवर जाण्याचा प्लॅन करा. बजेट फ्रेंडली आणि चवदार पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर यंदा 4 जून 2019 च्या आधी एकदा नक्की भेट द्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now