पितृपंधरवडा 2018 : श्राद्धाच्या वाडीसाठी तांदळाची खीर कशी बनवाल ?

श्राद्धाच्या जेवणात वड्यांसोबत आवश्यक असणारी तांदळाची खीर कशी बनवाल ?

तांदळाची खीर ( Photo Credits : pixabay.com )

भाद्रपद शुक्ल पंधरवडा हा काळ हिंदू पुराणानुसार पितृपक्ष समजला जातो. या पंधरा दिवसांच्या काळात मृत पावलेल्या आप्तजनांना तृप्ती आणि शांती मिळावी याकरिता प्रार्थना केली जाते. काही जण या काळात दान धर्मदेखील करतात.

पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये यमराज सार्‍या मृत आत्म्यांना मुक्ती देतो. या काळात ते आपल्या प्रिय व्यक्तींकडे जाऊ शकतात. त्यामुळे मृत आत्म्याच्या आवडीचे काही पदार्थ या काळात केले जातात. पितृपंधरवडा 2018 : ... म्हणून पितृपंधरवड्यात पूर्वजांचं स्मरण केलं जातं !

पितृपक्षात काय करतात ?

एखादी व्यक्ती ज्या तिथीला मृत पावली पंधरवड्यातील त्या तिथीला विशिष्ट व्यक्तीसाठी जेवण म्हणजेच वाडी दाखवण्याची प्रथा आहे. यामध्ये नेहमीच्या जेवणासोबत वडे आणि तांदळाची खीर बनवण्याची पद्धत आहे. आजकाल इंन्स्टंट फूडच्या जमान्यात पारंपारिक पदार्थ बनवण्याची सवय हळूहळू मागे पडत आहे. मग पहा यंदा घरच्या घरी कशी बनवाल तांदळाची खीर

तांदळाच्या खीरीला आवश्यक साहित्य

साहित्य

वाटीभर सुवासिक तांदूळ

पाणी

वाटीभर साखर / गूळ

जायफळ - वेलचीपूड

केशर

अर्धा लीटर उकळलेलं दूध

कृती

झटपट खीरीची रेसिपी

तांदूळ धुवून सुकवलेले नसतील तर थेट वाफवलेला भात मिक्सरमध्ये लावा. तूपात गूळ वितळवून त्यावर भाताची पेस्ट परतून दूधात उकळा. यामध्ये किंचिंत मीठ टाका म्हणजे चव उत्तम येते.