पितृपंधरवडा 2018 : पितृपक्षातील श्राद्धाच्या जेवणात कसे बनवाल काकडी वडे?
ते नेमके कसे करावेत ?
भाद्रपद शुक्ल पंधरवड्यामध्ये हिंदू धर्मात पितृ पंधरवडा पाळतात. या दिवसात आप्तजनांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळावी याकरिता प्रार्थना केली जाते. काही लोकांकडे श्राद्धांचं जेवण, ब्राम्हणपूजा आणि ब्राम्हणभोजन अशा विविध स्वरूपात विधी केले जातात. विधीवत वाडी काढून जेवणातील काही घास कावळा, गायीला दिला जातो. या श्राद्धाच्या जेवणात इतर पदार्थांसोबत वडे आणि खीर हे पदार्थ प्रामुख्याने ठेवले जातात. मग पहा श्राद्धासाठी काकडी वडे कसे जातात. पितृपंधरवडा 2018 : ... म्हणून पितृपंधरवड्यात पूर्वजांचं स्मरण केलं जातं !
नेहमीच्या जेवणातील वड्यांपेक्षा श्राद्धाच्या दिवसातील जेवणात असलेले काकडी वडे हे वेगळे असतात. ते नेमके कसे करावेत ? हे पाहण्यासाठी त्याची कृती आणि साहित्य -
साहित्य -
मोठी काकडी
मीठ
पाणी
वड्याचं पीठ
कसे बनवाल काकडी वडे ?
वड्यांसाठी मोठी काकडी वेगळी मिळते. बाजरात या ऋतूमध्ये मिळणारी काकडी घ्या.
काकडी सोलून ती किसून घ्या.
काकडीचा किस थोडा वाफवून घ्यावा.
वाफवलेल्या काकडीमध्ये वड्याचं पीठ मिसळा.
तयार मिश्रण एकत्र मळा.
नेहमीच्या इतर वड्यांप्रमाणेच काकडीचे वडेदेखील लहान लहान गोळे करून थापावेत आणि तळा.
श्राद्धाच्या जेवणामध्ये काकडी वड्यासोबत तांदळाची खीर बनवण्याची पद्धत आहे. मग पहा काकडी वड्यांसोबत पारंपारिक पद्धतीने कशी बनवाल तांदळाची खीर