Nag Panchami 2020 Special Recipes: नागपंचमी निमित्त पातोळ्या, पुरणाचे दिंड नैवैद्याला कसे बनवाल?

घरच्या घरी नागपूजा करून नागपंचमीचा सण साजरा करणार असाल तर पहा नैवेद्याला हमखास बनवले जाणारे पारंपारीक पदार्थ पातोळ्या आणि पुरणाचे दिंड झटपट घरच्या घरी कसे बनवले जातात?

Patolya and Dinda| Photo Credits: Instagram

महाराष्ट्रात श्रावण (Shravan)  महिन्यातील पहिला सण हा श्रावण शुक्ल पंचमी दिवशी नागपंचमी (Nag Panchami) हा साजरा करतात. माहेरवाशीण महिलांसाठी, मुलींसाठी हा दिवस खास असतो. या निमित्ताने मैत्रिणींसोबत खेळ खेळण्याची, सण साजरा करण्याची संधी त्यांना मिळते. सण म्हटला की गोडा-धोडाचे पदार्थ आलेच. नागपंचमीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर, गोवा मध्ये हळदीच्या पानातल्या पातोळ्या करण्याची पद्धत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात पुरणाचे दिंड केले जातात. मग यंदा तुम्ही देखील घरच्या घरी नागपूजा करून नागपंचमीचा सण साजरा करणार असाल तर पहा नैवेद्याला हमखास बनवले जाणारे पारंपारीक पदार्थ पातोळ्या आणि पुरणाचे दिंड झटपट घरच्या घरी कसे बनवले जातात?

नागपंचमी यंदा 25 जुलै दिवशी महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. यंदा कोरोना संकट काळात विनाकारण बाहेर पडू नये असं सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे यंदा पाटावर नागाचं चित्र काढून त्याची पूजा करणं हेच हितावह आहे. पण नैवेद्याला आणि नागपंचमीचा सण म्हणून गोडाचा पदार्थ पातोळ्या, पुरणाचे दिंड कसे बनवाल हे नक्की पहा.

पातोळ्या

पुरणाचे दिंड

अनेकजण नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याला दूध-लाह्यांचादेखील नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात नागपंचमीला जेवण बनवताना त्यामध्ये चिरलेल्या, तळलेल्या, कपलेल्या जिन्नासांचा वापर करू नये अशी देखील प्रथा काहीजण पाळतात. त्यामुळे राज्यभरात नागपंचमी दिवशी जेवणात अनेक खास पदार्थ दिसतात. दरम्यान काही जणी नागपंचमी दिवशी भावासाठी देखील एका दिवसाचा उपवास करून हे व्रत करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif