Independence Day 2020 Special Tricolour Menu: सॅन्डव्हिच ते पुडिंग च्या माध्यमातून तिरंगा मेजवानीचा आस्वाद घेत साजरा करा 74 वा भारतीय स्वातंत्र्यदिन

पहा तिरंगा इडली, सॅन्ड्व्हिच, ढोकळा ते पुडिंगची रेसिपी

Tricolour food recipes (Photo Credits: Video Grab)

भारतामध्ये यंदा 74 व्या स्वातंत्र्यदिनाची धूम आहे. दरम्यान यावर्षी भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट दाट असल्याने सार्वजनिक स्वरूपात मोठ्या जल्लोषात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाऊ शकत नाही. परंतू यंदा व्हच्युअल माधयामातून आणि घरच्या घरीच स्वातंत्र्यदिन साजरा करणं हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मग यंदा हे सेलिब्रेशन खाद्यपदार्थांच्या माध्यमातूनही केले जाऊ शकते. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच असल्याने अनेक नवनवीन पदार्थ तुम्ही आजमाजून पाहिले असतील मग आता त्यांमध्ये तिरंगी सजावट कराता येईल का? हे पहा.  Indian Independence Day 2020 Date, Theme, Significance: भारताचा यंदा 74 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या या दिवसाचंं महत्त्व आणि थीम.

भारताचा यंदाचा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट दिवशी आहे. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करणार्‍यांनी सकाळच्या ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थांना तुम्ही तिरंगी बनवू शकतात. मग असे पदार्थ कोणते?

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवू शकाल असे तिरंगी पदार्थ

तिरंगा सॅनडव्हिचमध्ये तुम्हांला दोन स्लॅईसमध्ये भरता येईल असं स्टफिंग तिरंगामध्ये बनवता येऊ शकतं.

इडलीच्या पीठामध्ये हिरवा आणि केशरी रंगासाठी पालेभाज्याची प्युरी आणि केशर किंवा टोमॅटो प्युरीचा वापर करून तिरंगा इडली बनवता येऊ शकते.

तिरंगी ढोकळ्यासाठी पिठामध्येच तिन्ही रंगाचा किंवा पर्यायी भाज्यांचा रंग वापरता येऊ शकतो.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी तुम्ही अशाप्रकारे काही हटके रेसिपी करून पाहू शकता. यंदा तिरंगा थीम बेस्ड जेवणाचा आनंद लुटून स्वातंत्र्य दिन साजरा करताना स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला विसरू नका. भारतच्या 74व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !