Green Chilli Pickle Recipe: हिरव्या मिरचीचे लोणचे रेसिपी; व्हिडिओ पाहा, मिळतील अनेक टीप्स

आज आम्ही आपल्याला हिरव्या मिरचीचे लोणचे (Green Chilli Pickle Recipe in Marathi) कसे बनवायचे? याबाबत सांगणार आहे. घ्या जाणून.

Green Chilli Pickle Recipe | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

लोणचे (Pickle) हा भारतीय खाद्य संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक. हा एक सर्वपरीचीत आणि प्रत्येकाच्या पानावर आढळणारा पदार्थ असला तरी ते काही प्रमुख अन्न नव्हे. असे असले तरी मिठ जशी जेवणाची गोडी वाढवते तसेच लोणचे (Green Chilli Pickle Recipe) देखील पानाची गोडी वाढवते. त्यामुळे पानावर म्हणजेच जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी लोणचे हजर असतेच. सुरुवातीला केवळ अंबा किंवा लिंबू यांसारक्या फळांपासून तयार करण्यात येणारे लोणचे आता इतरही फळांपासून अथवा फळभाजीपासून बनवले जाते. आज आम्ही आपल्याला हिरव्या मिरचीचे लोणचे (Green Chilli Pickle Recipe in Marathi) कसे बनवायचे? याबाबत सांगणार आहोत.

गोड-आंबट चवीचे लज्जतदार लोणचे पानाची शोभा आणि जिभेची चव वाढवतात. पण त्याची रेसिपीसुद्धा तितकीच वैविध्यपूर्ण असते. जाणून घ्या हिरव्या मिरचीचे लोणचे बनविण्याची रेसीपी. काही लोकांना हिरव्या मिरचीच्या आत मसाला भरून चोंदलेले आचार बनवणे आवडते. तर काही लोक पातळ, लहान मिरच्यांनी बनवलेल्या अर्ध-कोरड्या लोणच्याचा आनंद घेतात. हिरव्या मिरचीच्या लोणच्याची आणखी एक रेसीपी आम्हाला सापडली आहे. ही खास रेसिपी फूड ब्लॉगर पारुलने तिच्या 'कुक विथ पारुल' या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.

हिरव्या मिरचीचे लोणचे, रेसीपी आणि टीप्स

ट्विट

लोणचे कसे मुरवाल?

लोणचे चांगले मुरविण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने साठवण होणे आवश्यक आहे. त्यासाठी एक काचेचे स्वच्छ भांडे घ्या. ते भांडे पूर्णपणे कोरडे करा. सोबतच मंद आचेवर कोळशाचे काही तुकडे जाळा. ते एका रिकाम्या प्लेटवर ठेवा. त्यावर थोडे हिंग टाका. कोळ्यातून येणारा हिंगाचा धूर काचेच्या भांड्यात साठवा आणि भांडे एक मिनीट बंद करा. एका मिनीटाने काचेचे भांडे उघडा. त्यातील धूर पूर्ण बाहेर जाऊ द्या. आता तुम्ही तुमचे लोणचे मुरण्यासाठी बरणीत (काचेच्या भांड्यात) ठेवा. एक दोन दिवस लोणचे चांगले मुरल्यानंतर ते आवश्यकतेनुसार पानात घ्या.