Father's Day 2020 Cake Ideas: फादर्स डे निमित्त घरच्या घरी केक बनवून बाबांना सरप्राईज देण्यासाठी पहा Easy Tutorial Video!
यासाठी अनेक कुकींग व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.
जगभरात जून महिन्याच्या तिसर्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. यंदा 21 जून दिवशी हे सेलिब्रेशन होणार आहे.सध्या लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने बाहेर पडणं, बाहेरचं खाणं टाळण्यातच हित आहे. मग यंदा बाबांना गिफ्ट देऊन खूष करण्यासाठी एक क्रिएटिव्ह पर्याय म्हणजे केक! तुम्हांला बेकिंगची हौस असेल तर या रविवारी तुमच्या वडिलांना खूष करण्यासाठी तुम्ही स्वतः केक बनवून ट्रीट देऊ शकता. यासाठी अनेक कुकींग व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. Happy Father's Day 2020 Messages: फादर्स डे निमित्त बाबांना मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून पाठवून करा पितृदिन साजरा.
चॉकलेट केक, बिस्किट केक अशा अनेक पर्यायांनी अगदी झटपट घरी केक बनवता येऊ शकतो. यंदा कोरोनाच्या दहशतीमुळे बाहेर पडणं, भटकणं यावर बंधनं आहेत. पण हा वेळ तुमच्या कुटुंबासोबत एकत्र घालवण्यासाठी वापरून यंदाचा फादर्स डे नक्की अविस्मरणीय करू शकता. मग तुम्ही केक बनवण्याचा घाट घालणार असाल तर पहा कोणकोणते केक बनवू शकता?
फादर्स डे स्पेशल केक आयडियाज
बिस्किट केक
बिस्किट केक हा झटपट बनणार्या केक्सपैकी एक आहे. बॅटर मध्ये बिस्किटचा वापर करून दूध, साखर मिसळून अवघ्या काही मिनिटांत तयार होणारा हा केक झटपट बनतो देखील आणि चवीलादेखील टेस्टी आहे.
चॉकलेट केक
चॉकलेट हा अनेकांचा विक पॉंईट आहे. घरच्या घरी अंड, मैदा, चॉकलेटचा वापर करून तुम्ही चॉकलेट केक बनवू शकता.
सरप्राईज इन्साईड केक
आजकाल केकमध्येच काही गिफ्ट्स लपवण्याचाही ट्रेंड आहे. यामध्ये तुम्ही बाबांना एक नव्हे तर अनेक गिफ्ट्स देऊन सरप्राईज करू शकता.
केक कसा सजवाल?
केक बनवण्याइतकीच केक सजवण्यामध्येही धम्माल आहे, कसरत आहे. त्यासाठी तुम्हांला अनेक ऑनलाईन आयडियाज मिळू शकतात.
मग यंदाच्या फादर्स डे 2020 दिवशी तुम्ही घरच्या घरी फादर्स डे सेलिब्रेशनचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हांला अनेक केक्स ट्राय करता येऊ शकता. या वर्षी लॉकडाऊन मध्ये जसा मदर्स डे साजरा केला तसाच यंदा फादर्स डेचाही उत्साह द्विगुणित करण्यासाठी तुमच्या यापेक्षा काय वेगळा प्लॅन आहे? हे देखील आमच्यासोबत शेअर करा.