'या' खाण्याच्या गोष्टींपासून दूर रहा, नाहीतर Cancer होण्याची शक्यता वाढेल
तुम्ही खात असलेल्या 'या' गोष्टींपासून दूर रहा नाहीतर कॅन्सरला आमंत्रण देण्याची वेळ तुमच्यावर ओढण्याची शक्यता वाढेल.
आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या वजनावर, त्वचेवर किंवा केसांवर पडत नसून तो संपूर्ण शरिरावर पडतो. त्यामुळे आपण सेवन करत असलेले अन्न हे उत्तम आणि आरोग्यास पोषक असावे असे सांगितले जाते.
सध्या फास्ट फुड आणि हवाबंद पिशव्यांमध्ये मिळाणाऱ्या पदार्थांची संख्या खुप वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत हे पदार्थ खाल्ल्यास त्याचा शरिरावर कालांतराने वाईट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून तुम्ही खात असलेल्या 'या' गोष्टींपासून दूर रहा नाहीतर कॅन्सरला आमंत्रण देण्याची वेळ तुमच्यावर ओढण्याची शक्यता वाढेल.
1. सॅच्युरेटेड फॅट (Saturated fat)
संशोधनाच्या माध्यमातून क्लिनिकल ऑन्कोलॉजी नावाच्या एका मासिकात डायट्री फॅट (Daitry fat) आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत असे सांगितले. त्यामुळे व्यक्तीच्या शरिरातील फुफ्फुसामध्ये कॅन्सर(Cancer) तयार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला या गंभीर आजारापासून दूर राहायचे असेल तर फ्रेंच फ्राईज (French Fries) सारखे पदार्थ खाणे टाळावे.
2. दारु (Alcohol)
अमेरिकन इंस्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च आणि वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड यांनी मिळून एक संधोशन केले. त्यामध्ये 1 ग्लास दारु सोबत कोल्ड ड्रिंक (Cold Drink) प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा (Brest Cancer) धोका संभवतो असे समोर आले आहे.
3. तळलेले बटाटे (Crispy Fired Potatos)
UK च्या एका फास्ट फुड स्टँडर्ड कंपनीच्या म्हणण्यानुसार तळलेले बटाटे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. बटाटे तळल्यानंतर ते कुरकुरीत होतात. मात्र स्टार्च असणारे खाद्य पदार्थ उच्च तापमानावर तळले जातात. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये Acrylamide तयार होते. हे धोकादायक केमिकल कॅन्सरला आमंत्रण देण्याते लक्षण ठरु शकते.
4. खूप गरम कॉफी (Hot Coffee)
चहा आणि कॉफी पिणाऱ्यांनो सतर्क रहा. परंतु चहा आणि कॉफी प्यायल्यामुळे जास्त नुकसान तर होत नाही. परंतु तुम्हाला जास्त गरम कॉफी वगैरे पिण्याची सवय असेल तर ती सवय आधी थांबवा. कारण कॉफी पिताना घश्यातून पोटापर्यंत जाणाऱ्या नळीमध्ये गरम गरम कॉफीचा परिणाम होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते.
5. शीत पेये (Cold Drinks)
जास्त प्रमाणात थंड पेये पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते. तर थंड पेयाच्या बॉटलमध्ये 10 चमचे साखर असते. परंतु त्यातील गोडवा हा शरिरासाठी हानिकारक असून त्यापासून कॅन्सरचा धोका संभवतो. या पेयांमुळे फक्त कॅन्सरच नाही तर लठ्ठपणा ही वाढतो.