Edible Oil To Get Cheaper: गोडेतेल होणार स्वस्त; सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात 12.5% पर्यंत कपात
केंद्र सरकारने सोयाबीन ( Soybean Oil) आणि सूर्यफूल तेल (Sunflower Oil) सीमाशुल्क (Customs Duty) आयातीत कपात केली आहे. परिणामी देशातील गोडेतेल दर नियंत्रणात येऊन नागरिकांसाठी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Edible Oil Customs Duty: सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने सोयाबीन ( Soybean Oil) आणि सूर्यफूल तेल (Sunflower Oil) सीमाशुल्क (Customs Duty) आयातीत कपात केली आहे. परिणामी देशातील गोडेतेल दर नियंत्रणात येऊन नागरिकांसाठी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारने सोया आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केले आहे. हा नवा बदल गुरुवार (15 जून) पासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुार, आता सर्वच कच्चा तेलावर म्हणजेच क्रूड पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोया तेलावर 5% आयात शुल्क लागू होणार आहे. याचा अर्थ असा की, एकूण 5.5% कर आकारणी होईल. रिफाइंड खाद्यतेलाच्या बाबतीत, प्रभावी आयात शुल्क 13.75% आहे, तर त्यांच्या शुद्ध तेलावर 12.5% आयात शुल्क आणि आयात शुल्कावर 10% उपकर लागू होईल. (हेही वाचा, Edible Oil Adulteration: खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखावी? FSSAI सांगीतली घरगुती युक्ती)
पाठिमागील काही काळापासून देशातील महागाई सातत्याने वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खाद्य तेलाने तर केव्हाच शंभरी पार केली आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल, डिझेलच्या इंधनापेक्षाही खाद्यतेल अधिक महाग झाले आहे. त्यामुळे सामन्यांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड चिड निर्माण झाली आहे. परिणामी जनतेच्या मनातील असंतोष कमी करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पावले टाकत आहे. त्यामुळेच सरकारकडून खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ट्विट
खाद्यतेल म्हणजे मानवी वापरासाठी योग्य असलेले कोणतेही तेल. हे सामान्यतः स्वयंपाक आणि अन्न तयार करण्यासाठी वापरले जाते. विविध प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत, प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये, चव आणि पौष्टिक गुणधर्म वेगवेगले आहेत. खाद्यतेले बनवीण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. काही खाद्यतेले ही सोयाबीन, कॉर्न, सूर्यफूल बियाणे, भूईमूग आणि पाम फळे यांसारख्या वनस्पती स्रोतांमधून काढली जातात. काही प्रमाणात काही तेले ही मासे आणि इतर स्त्रोतांपासून काढली जातता. तेल हा भारतीय खाद्यसंस्कृतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.