Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया साठी बनवून पाहा आंब्याच्या या पाच हटके पाककृती
आज, 7 मे ला देशभरात मोठ्या उत्साहात अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे, यानिमित्ताने आंब्याच्या या हटके रेसिपी बनवून तुमच्या जिभेचे चोचले पुरवू शकता
Akshaya Tritiya Special 5 Mango Recipes: सणासुदीचा दिवस आणि गोडाधोडाचं जेवण हे समीकरण म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच म्हणता येईल. एन उन्हाळ्यात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) देखील काही याला अपवाद नाही. मे (May) महिन्यात वाढत्या तापमानाने त्रासलेल्यानां थंडावा देणारा आंबा (Mango) हा या दिवशी जेवणाचा मुख्य हिरो मानला जातो.आज, 7 मे ला देशभरात मोठ्या उत्साहात अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे,आमरस (Aamras),आम्रखंड (Aamrakhand) या पदार्थांची पर्वणी या दिवशी हमखास प्रत्येक घरात पाहायला मिळते. पण या नेहमीच्या पदार्थांना तुम्हीही कंटाळलायत का? काहीतरी हटके ट्राय करण्याची तुमची इच्छा असेल तर एकदा आंब्याच्या या फंडू रेसिपीज नक्की करून पहा...
आंबा सासव
जास्त गोड न खाणाऱ्यांसाठी गोव्यात प्रसिद्ध असणारी ही पाककृती म्हणजे उत्तम पर्याय म्हणता येईल. गोवा प्रांतात मोहरीला सासव म्हणतात. या साठी हापूस आंब्याऐवजी छोटे रायवळ आंबे देखील तुम्ही वापरू शकता मात्र हे आंबे पिकलेलेच घ्यावेत, आंब्याचा गोडवा व सोबत खोबरे, मोहरी, लाल मिरची यांचा मसालेदार टच देऊन ही डिश तयारी केली जाते. आंब्याचे सासव भातासोबत खाण्याची बात काही औरच!
संपूर्ण रेसिपीसाठी पहा..
मँगो चीज रोल
पारंपरिक पाककृतींना रामराम करून आंब्याचीही फ्युजन रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. आंब्याच्या पातळ कापांमध्ये पनीर, सुका मेवा, व चीज टाकून रोल करत तुम्ही अगदी घरच्याघरी देखील ही स्टायलिश डिश तयार करू शकता.यासाठी पूर्णपणे पिकलेल्या आंब्यापेक्षा अर्धवट पिकलेला हिरवट आंबा वापरल्यास छान आंबट गोड चव मिळवता येते
संपूर्ण रेसिपीसाठी पहा..
मँगो पिझ्झा
लहान मुलांना कोणताही पदार्थ थोडा ट्विस्ट करून दिल्यास ते नक्कीच आवडीने खातात,खरतर पिझ्झा हा लहानग्यांचा आवडीचा पदार्थ असला तरी त्यातील मैद्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. ज्वारी, नाचणी, बाजरी सारख्या धान्याचे पोषण त्यांना या फंडू मँगो पिझ्झाच्या रूपात पुरवले जाऊ शकते. मैदा किंवा इतर धान्यांच्या पिठाचा बेस तयार करून त्यावर मेल्टेड चॉकलेट, हापूस किंवा पायरी आंब्याचे काप व सुका मेवा टाकून अवघ्या दहा मिनिटात तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. हा पिझ्झा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ल्यास आणखीनच चविष्ट लागतो.
संपूर्ण रेसिपीसाठी पहा..
आंबा केक
हापूस आंब्याचा गर वापरून घरच्याघरी हा एगलेस आंबा केक तुम्ही बनवू शकता. या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हनचा वापर न करता प्रेशर कुकरमध्ये देखील तयार करू शकता.
संपूर्ण रेसिपीसाठी पहा..
आंबा लाडू
आजवर तुम्ही आंबावडी, आंब्याची साट हे पदार्थ तुम्ही ऐकले असतील, पण यंदा सणाला आंबा लाडू तयार करून पाहा. खरतर लाडू बांधायचे म्हंटले की अगदी मातब्बर गृहिणींची देखील फसगत होऊ शकते पण अगदी मोजक्या सामग्रीने बनणारे हे लाडू वळायला सोप्पे आणि खायला चविष्ट बनतात.
संपूर्ण रेसिपीसाठी पहा..
अक्षय्य तृतीया निमित्त देवांचे पूजन झाल्यावर यंदा या फंडू रेसिपीसोबत सणाची शान वाढवून पोटपूजा केल्यास मनाला शांती मिळेल हे नक्की!