Yashwantrao Chavan Death Anniversary: यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे हे महत्त्वपूर्ण विचार

तो एक विचार होता. थेट स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत यशवंतरावांचा मोठा हातभार आहे.

Yashwantrao Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 36 वी पुण्यतिथी ( Yashwantrao Chavan Death Anniversary). यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) हे केवळ एक व्यक्ती नव्हते. तो एक विचार होता. थेट स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत यशवंतरावांचा मोठा हातभार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या यशवंतरावांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी दिल्लीला बोलवून घेतले. त्यांच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. पुढे यशवंतरावांकडे केंद्रात उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री या पदांची जबाबदारी आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही राहिले. अशा या यशवंतरावांची आज 36 पुण्यतीथी. यशवंतरवांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचेह हे काही महत्त्वपूर्ण विचार. (Yashwantrao Chavan Thoughts)

दरम्यान, यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणीच नव्हते. ते चांगले वक्ते, साहित्यीकही होते. चळवळीतून आल्याने त्यांना समाजकार्याची मोठी जाण होती. त्यांच्या लोकसंपर्क दांडगा होता. तळागाळातील जनता ते मोठमोठे कलावंत, विचारवंत आणि देशविदेशातील उत्तम राजकारणी, नेते यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते.