Yam Deep Daan 2023 Shubh Muhurat: अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीला करा 'यम दीप दान'; जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
ही पूजा दिवसा न करता रात्री केली जाते आणि पूजा केल्यानंतर यमाच्या नावाने दिवा लावून घराबाहेर ठेवला जातो.
Yam Deep Daan 2023 Shubh Muhurat: दिवाळीचा (Diwali 2023) पाच दिवसांचा सण धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi 2023) सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धन त्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीसोबत कुबेर आणि यमराज यांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रीय पंडितांच्या मते यावेळी त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर या दिवशी येत आहे. या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावला जातो, त्याला यम दीप दान (Yam Deep Daan 2023) म्हणतात.
अशा स्थितीत यम दीप दान शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रज्वलित होईल. या दिव्यामुळे अकाली मृत्यू टाळता येईल, असा समज आहे. घरातील कोणत्याही वडील माणसाने हा दिवा प्रज्वलित करून घराबाहेर लावावा.
सनातन धर्मात दिवाळी हा मोठा सण मानला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोटी दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी होणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. हा दिवस 'धनत्रयोदशी' किंवा 'धन्वंतरी दिन' म्हणूनही ओळखला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशीच आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरी यांचा जन्म दिन साजरा केला जातो. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीपासून हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणूनही साजरा केला जात आहे.
त्रयोदशी तिथी-
सुरुवात- 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 वाजता
समाप्ती- 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:57 वाजता.
यम दीपम मुहूर्त- 10 नोव्हेंबर संध्याकाळी 05:30 ते संध्याकाळी 06:49 पर्यंत
कालावधी - 01 तास 19 मी.
धनत्रयोदशीच्या दिवशीच गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती घरी आणल्या जातात, ज्यांची दिवाळीच्या मुख्य दिवशी पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा वर्षातील असा एक दिवस आहे ज्यादिवशी आपण यमराजाची पूजा करतो. ही पूजा दिवसा न करता रात्री केली जाते आणि पूजा केल्यानंतर यमाच्या नावाने दिवा लावून घराबाहेर ठेवला जातो.धनत्रयोदशी हा वर्षातील असा एक दिवस आहे ज्यादिवशी आपण यमराजाची पूजा करतो. ही पूजा दिवसा न करता रात्री केली जाते आणि पूजा केल्यानंतर यमाच्या नावाने दिवा लावून घराबाहेर ठेवला जातो.
ज्या घरांमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावला जातो, तिथे कधीही कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही अशी मान्यता आहे. (हेही वाचा: Vasu Baras 2023 Muhurat: वसूबारस यंदा 9 नोव्हेंबरला; जाणून घ्या गोवत्स द्वादशीला पूजन कसं कराल?)
पूजा विधी-
धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दक्षिणेकडे दिवा लावण्याची जागा शेण किंवा गेरूने सारवून तेथे रांगोळी घालावी. त्यावर पीठापासून तयार केलेला चार मुखी दिवा लावून फुले, तांदूळ, गूळ आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. दिव्याभोवती गंगाजल शिंपडावे. मृत्यूची देवता यमराजासाठी हा दिवा लावला जात असल्याने दिवा लावताना पूर्ण भक्तिभावाने त्याला नमस्कार करावा. तसेच तुमच्या कुटुंबातील कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये अशी प्रार्थना प्रार्थना करावी. यमाची पूजा करून शेवटी धन्वंतरीची पूजा करावी.
(टीप- या लेखात समाविष्ट असलेली माहिती ही इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे)