World Saree Day 2022: इंडो फ्युजन अंदाजात साडी नेसून मिरवा ट्रेंडी लूक; पहा या हटके अंदाजाचे Saree Draping Videos (Watch Video)
भारतामध्ये राज्यागणिक जसे साड्यांचे प्रकार बदलतात तसेच साडी नेसण्याची पद्धतही बदललेली दिसते.
21 डिसेंबर हा दिवस 'वर्ल्ड साडी डे' (World Saree Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून साडीकडे पाहिलं जातं. भारतात राज्यागणिक साडी परिधान करण्याचे देखील वेगवेगळे अंदाज आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने सहावारी आणि नऊवारी साडी पारंपारीक अंदाजात नेसली जाते. पण आता या साडीसोबतही फॅशन जगतामध्ये वेगवेगळे लूक ट्राय केले जात आहेत. थीम पार्टीमध्ये अनेकींची पसंत साडीला असते. मग पहा मॉडर्न अंदाजात ट्रेंडी लूक मध्ये साडी काही हटके अंदाजात कशी नेसली जाऊ शकते?
साडी नेसणं आणि नेसवणं ही देखील एक कला आहे. आजकाल अनेकजणी महाराष्ट्रात सहावारी साड्या देखील खास ट्रिक्स आणि टीप्स वापरून नऊवारी अंदाजात नेसवली जाते. मग त्यामधूनच धोती स्टाईल साडी, नेक रॅप साडी हे अंदाजही लोकप्रिय होत आहेत. मग तुम्हांलाही या मॉडर्न अंदाजातील साडी नेसायची आहे? मग पहा त्यासाठीचे साडी ड्रेपिंगचे हे व्हिडिओज नक्की वाचा: World Saree Day : साड्यांना ग्लॅमरस लूक मिळवून देणाऱ्या बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री.
मॉर्डन आणि ट्रेंडी लूक मधील काही साड्या नेसण्याचे अंदाज
साडी ड्रेस
धोती स्टाईल साडी
पॅन्ट स्टाईल
नेक रॅप स्टाईल
भारतामध्ये जशा साडी नेसण्याचे विविध प्रकार आहेत तसेच साडी परिधान करण्यासाठी कापडांमध्येही अनेक प्रकार आहे. बनारसी, पैठणी, लखनवी, इंंदुरी या पारंपारीक साड्या आहेत. आजकाल साड्या सहज नेसता याव्यात, त्या सावरणं सुकर व्हावं म्हणून टिश्यू, नेटेट, ऑर्गेंज़ा साड्या देखील उपलब्ध आहेत. साड्याच्या कापडावरूनही ती परिधान करून येणारा लूक वेगवेगळा असतो.