World Sanskrit Day: जागतिक संस्कृत दिनाचा इतिहास आणि महत्त्व याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
ज्याला आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन असेही म्हटले जात आहे. जो श्रावण पौर्णिमेला (Shravana Poornima) साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी हा दिवस आज ( गुरुवार, ३१ ऑगस्ट) आला आहे. संस्कृत ही भाषा आहे.
जगभरात आज संस्कृत दिन (International Sanskrit Day 2023) साजरा केला जातो आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन असेही म्हटले जात आहे. जो श्रावण पौर्णिमेला (Shravana Poornima) साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी हा दिवस आज ( गुरुवार, ३१ ऑगस्ट) आला आहे. संस्कृत ही भाषा आहे. जी भारत आणि जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या भाषेप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्राचीन काळापासून संस्कृत भाषेला खूप महत्त्व आहे. ही भाषा साहित्य, तत्त्वज्ञान, गणित आणि विज्ञान यासारख्या क्षेत्रातील विविध शास्त्रीय ग्रंथांचा पाया म्हणून ओळखली जाते. जागतिक संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, तिचे जतन करण्याच्या उपाययोजनांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. संस्कृत दिनाच्या काही उपक्रमांमध्ये सेमिनार, कार्यशाळा, शैक्षणिक भाषणे आणि व्याख्याने यांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय संस्कृत दिनाचा इतिहास
संस्कृत दिन साजरा करण्याची घोषणा भारत सरकारने 1969 मध्ये केली होती. हा दिवस प्रसिद्ध संस्कृत विद्वान पाणिनी यांचा विचार आणि या विचारांच्या वारशा प्रती असलेला आदर दाखविण्याासाठी साजरा करण्याच्या हेतूने सुरुवात झाली. त्यामुळेच पाणिनीच्या जयंतीदिनी दरवर्षी जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो. पाणीनी यांना भाषेच्या उत्क्रांतीत योगदान आजपर्यंत महत्त्वपूर्ण आणि अतुलनीय आहे.
संस्कृतसाठी जागतिक पातळीवर साजरा होणारा हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण या इंडो-आर्यन भाषेने केवळ भारतीय उपखंडातच नव्हे तर युरोपसारख्या खंडांमध्येही यशस्वीपणे छाप सोडली आहे. या भाषेतील शब्दांचा प्रभाव संस्कृत ग्रीक आणि लॅटिन सारख्या भाषांमध्ये योगदानासाठी प्रसिद्ध आहे.