World Environment Day Messages & Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करून व्यक्त करा निसर्गप्रेम!

यंदाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या दिनाचे महत्व सांगणारी आणि शुभेच्छा देणारी ही मराठमोळी शुभेच्छापत्र Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

Environment Day 2020 Marathi Messages & Wishes: दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा 5 जून जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जाणार आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम ही जैविविधतेवर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुद्धा येऊ घातलेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग संरक्षण आणि संवर्धनात आपला हातभार लावण्याचे आवाहन केले होते. यंदा कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे पर्यावरणाचे बरेच भले झाले आहे. अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मोकळेपणाने हिंडू फिरू लागल्याचे समोर आले आहे. पर्यावरण कायम हेल्थी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे आवश्यक आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग रक्षणाची गरज आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक, आणि सोशल मीडिया परिवारापर्यंत पोहचवून तुम्ही ही सुरुवात करू शकता. यासाठी पर्यावरण दिनाचे महत्व सांगणारी आणि शुभेच्छा देणारी ही मराठमोळी शुभेच्छापत्र Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिन थीम विषयी जाणून घ्या सविस्तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केले 'हे' खास आवाहन

असं म्हणतात, चांगल्या कामाची सुरुवात जितकी आवश्यक असते, तितकेच ते काम करण्यास इतरांना प्रेरणा देणेही महत्वाचे आहे, त्यामुळे या शुभेच्छापत्रातून तुमच्या ओळखीतील मंडळींना निसर्ग संवर्धनाची प्रेरणा देता येतील, त्यासाठी ही डिजिटल मोफत शुभेच्छापटर डाउनलोड करून शेअर करण्याची मेहनत तुम्हाला घ्यायची आहे.

जागतिक पर्यावरण दिन मराठी शुभेच्छा

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

World Environment Day Marathi Wishes (Photo Credits: File Image)

दरम्यान, यंदाच्या जैवविविधता रक्षण थीमनुसार आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पक्षी आणि प्राणी यांना पाणी, आणि खाणे उपलब्ध करून देणे, देशातील गावखेड्यांनी पावसाच्या पाण्याचा साठा आणि संवर्धन करणे असे सोप्पे मार्ग अवलंबून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. जागतिक पर्यावरण दिनी दरवर्षी अनेक ठिकाणी रॅली आयोजित केल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे तुमचे योग्य काम हेच या दिवसाचे खरे सेलिब्रेशन ठरेल हे मात्र नक्की!