Happy World Environment Day Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! Quotes, Whatsapp Status द्वारे खास संदेश देऊन करा जाणीवजागृती
आजच्या लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे World Environment Day Messages & Wishes देत आहोत. जे आपण Greetings, Images, Whatsapp Status, Facebook आदी प्रकारांतून शेअर करु शकता.
World Environment Day Wishes in Marathi: जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा जगभरात मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत जबाबदारीने साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. सन 1974 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पृथ्वी आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असल्याने या दिवसाला काही लोक 'पीपल्स डे' म्हणूनही संबोधतात. वर्ल्ड एनवायरनमेंट डे (World Environment Day 2021) निमित्त अनेक लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आजच्या लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे World Environment Day Messages & Wishes देत आहोत. जे आपण Greetings, Images, Whatsapp Status, Facebook आदी प्रकारांतून शेअर करु शकता. निरामय आयुष्यासाठी पर्यावरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणातील बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात एक मोहीम राबवली जात आहे. पर्यावरण बदलामुळे भविष्यात सृष्टीचे आणि पर्यायाने मानवाचे आयुष्यमानच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जाता आहेत.
जागतिक पर्यावरण दिन आणि 5 जून हे आता एक समिकरणच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आह. असा विशेष दिवस साजरा करणे ही काळाजी गरजही आहे. विकासाच्या नावाखाली अखंड मानव जमातिने जगभात जो धुमाकूळ घातला आहे. त्याचे दुष्परणामही अखंड मानवजातीला भोगावे लागत आहेत. या दुष्परीनामाचे पहिले उदाहरण म्हणजे पर्यावरणीय बदल.
पर्यावरण बदलाबाबत आपण अद्यापही गंभीर नाही. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन आयोजित करुन जनजागृती करण्याची आवश्यकता जगभरातील अनेक देशांना वाटू लागली. त्यातूनच ही संकल्पना पुढे आली. दरम्यान, आपणही पर्यावरण संरक्षण करु इच्छित असाल तर, अगदीच फार काही मोठे करण्याची इतक्यात गरज नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही पर्यावरण संवर्धन संरक्षण करता येते.