World Blood Donor Day 2019: रक्तदान करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

तर रक्तादानाला 'महादान' असे सुद्धा संबोधले जाते. रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्यासोबतच त्याच्या विविध आजारांवच्या समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.

World Blood Donor Day (Photo Credits-File Image)

World Blood Donor Day 2019: आज देशभरात 'जागतिक रक्तदान दिन' साजरा करण्यात येत आहे. तर रक्तादानाला 'महादान' असे सुद्धा संबोधले जाते. रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्यासोबतच त्याच्या विविध आजारांवच्या समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते. भारतात प्रत्येकवर्षाला 1 करोड ब्लड युनिटची गरज भासते.

तसेच रक्तदान करण्यासाठी देशातील विविध रुग्णालयात ही सुविधा सुरु असते. त्याचसोबत रक्तदान शिबीरच्या माध्यमातून लोकांना रक्तादान करण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. तसेच लोकांना शिबीराच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे फायदे सुद्धा सांगितले जातात. तर जाणून घ्या रक्तदान केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.

-प्रत्येक तीन महिन्यांनी रक्तदान एकदा तरी रक्तदान करावे. त्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. त्याचसोबत हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

-रक्तदान केल्याने स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा आजार होण्याची शक्यता कमी असते.

- वजन कमी होण्यास मदत होते.

-रक्तदान केल्याने मानसिक संतुलन उत्तम राहते. त्याचसोबत तुम्ही रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळते.

-शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजारपणातसुद्धा आपल्याला अशक्तपणा जास्तप्रमाणात जाणवत नाही.

(तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मदत करेल गोड 'बडीशेप', वाचा गुणकारी फायदे)

तसेच रक्तदान करण्यापूर्वी एकदा वैद्यकीय चाचणी करु घ्यावी. जेणेकरुन आपण रक्तदान केल्यास आपल्याला असलेला आजार दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तर रक्तदान करण्यापूर्वी तुमच्या शरीराती हिमग्लोबिनचे प्रमाण 12.5 टक्के असणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुमचे वजन 50 किलोग्रॅमच्या खाली नसले पाहिजे.