Ghatasthapana 2023 Wishes In Marathi: घटस्थापनेनिमित्त Messages, HD Images, Quotes, WhatsApp Status द्वारे मित्र-परिवारास द्या मंगलमय शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Ghatasthapana 2023 Wishes In Marathi: हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण 4 नवरात्री (Navratri 2023) साजरी केल्या जातात, त्यापैकी दोन नवरात्र गुप्त असतात आणि उरलेल्या दोन नवरात्री थाटामाटात साजरे केल्या जातात. याच क्रमाने शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2023) येणार आहे. पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात माँ दुर्गेच्या आगमनाने नवरात्रीची सुरुवात होते.
शारदीय नवरात्र तिथी 15 ऑक्टोबर, रविवारपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर शारदीय नवरात्र तिथीची सांगता 24 ऑक्टोबर, मंगळवार रोजी होईल. घटस्थापनेनिमित्त HD Images, Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास मंगलमय शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Navratri 2023 Colours for 9 Days: नवरात्री मध्ये यंदा घटस्थापनेपासून नवमी पर्यंत पहा कोणत्या दिवशी कोणता रंग?)
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!
शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून सुरू होणा-या नवरात्र
आणि घटस्थापना ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता
आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो हीच
अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
घटस्थापनेच्या शुभेच्छा!
घटस्थापना मुहूर्ताची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 वा. तसेच घटस्थापना मुहूर्ताची समाप्ती 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. घटस्थापनेचा एकूण कालावधी 46 मिनिटे आहे.