Winter Health Tips: हिवाळ्यात हात-पाय थंड पडत असतील करा हे '4' झटपट उपाय

कित्येकदा अतिशय थंडी जाणवणंही असंख्य आरोग्यसंबंधी समस्यांचे मिळणारे संकेत असतात. असे वाटत असेल त्वरित उपाय म्हणून खालील गोष्टी कराव्यात

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Instagram)

थंडीला हळूहळू सुरुवात झाली असून थंडीत होणा-या आजारांनीही सुरुवात झाली आहे. थंडीत जास्त करून संधिवात, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार जास्त उद्भवतात. यात वातावरणातील गारव्यामुळे आपले हात-पाय खूप लवकर थंड पडतात. अशा वेळी तुम्हाला नेहमी एखाद्या गरम ठिकाणी बसावे, उबदार कपडे, स्वेटर घालावे असे वाटते. पण अनेकदा असे करुनही हात-पाय गरम होत नाही. असे होत असल्यास तुम्ही त्वरित त्या गोष्टीची दखल घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हिवाळ्यात हात आणि पायांचे तळवे अतिशय थंड पडणं म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता आणि रक्ताभिसरण योग्य स्थितीत होत नसल्याची सूचना आहे.

कित्येकदा अतिशय थंडी जाणवणंही असंख्य आरोग्यसंबंधी समस्यांचे मिळणारे संकेत असतात. असे वाटत असेल त्वरित उपाय म्हणून खालील गोष्टी कराव्यात

1. सैंधव मिठानं आंघोळ करा

जास्तच थंडावा जाणवत सैंधव मीठ गरम पाण्यात मिसळा आणि त्यामध्ये जवळपास 15 मिनिटांपर्यंत हात-पाय ठेवावेत. गरम पाण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं होतं. तसंच सैंधव मिठामुळे शरीरातील मॅग्नेशिअमची पातळीही वाढते, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक उब जाणवेल.

2. गरम तेलानं मसाज करा

थंड पडलेल्या हाता-पायांना गरम तेलानं मसाज करा. तेलानं मसाज केल्यानं हातापायांमध्ये ऊब निर्माण होईल. तसंच रक्तप्रवाह देखील सुधारेल. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदतही होईल. Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे

3. भरपूर प्रमाणात आर्यनचं सेवन करा

थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात आर्यन असलेल्या आहाराचं सेवन करणे. थंडीमुळे हात-पाय सुन्न होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी सोयाबीन, खजूर, पालक, सफरचंद, ऑलिव्ह आणि रताळ्यांचं सेवन करावं.

4. डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक

हातपाय थंड होण्याची परिस्थिती नियंत्रणात न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोबतच सतत थकवा जाणवणे, वजन जास्त वाढणं किंवा कमी होणं, ताप आल्यासारखं जाणवणं, गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, हात आणि पायांचे तळवे सुजणे अशा स्थितीत डॉक्टरांकडे जाऊन शारीरिक तपासणी करणं गरजेचं आहे.

थंडीत होणारा सर्वसाधारण गोष्ट असे समजून हात-पाय गार होणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. त्वरित त्यावर योग्य तो इलाज करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)