Halloween Festival: हॅलोविन म्हणजे काय? का साजरा केला जातो हॅलोविन फेस्टीव्हल? जाणून घ्या सविस्तर माहिती
गेले काही वर्षात भारतातील देखील काही प्रमुख शहरात हॅलोविन फेस्टीव्हल साजरा करण्यात येतो.
शेकडो वर्षांचा इतिहास असलेला हॅलोविन फेस्टीव्हल (Halloween Festival) दरवर्षी 31 ऑक्टोबरला (October) साजरा करण्यात येणार आहे. परदेशीत दरवर्षी हॅलोविन फेस्टीव्हल धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. पण गेले दोन वर्ष जगभरात कोव्हिड माहामारीचं (Covid Pandemic) सावट असल्याने हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. म्हणून जगातील विविध देशात हॅलोविन फेस्टीव्हल दणक्यात साजरा केला जात आहे. तर भारतातील काही प्रमुख शहरांमध्येही हॅलोविन फेस्टीव्हल साजरा केला जातो. ऑल सेंट्स डे (All Saint Day) किंवा ऑल होलोज डे हा 1 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ऑल होलोज डेच्या पूर्व संधेला हा सण साजरा करण्यात येतो म्हणून ह्याला हॅलोविन फेस्टीव्हल असं म्हणतात. या उत्सवादरम्यान आपल्या जगाचा आणि आत्म्यांच्या दरम्यानचा मार्ग खुला होतो, अशी संकल्पना आहे.
म्हणूनच या उत्सवात भूताचे पोशाख परिधान केल्या जातात. तरी या उत्सव साजरा केल्याने भूतांपासून दूर राहण्यास मदत होते अशी आख्यायिका आहे. हॅलोविन हा फेस्टीव्हल मुळ आयर्लंडमध्ये (Irland) साजरा करण्यात यायचा. पण आता कालांतराने युरोपातील (Europe) विविध देशांसह अमेरीकेतही (America) हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. काळानुसार हॅलोविन फेस्टीव्हलमध्ये (Halloween Festival) अधिक वेगवेगळे बदल झालेले बघायला मिळते. (हे ही वाचा:- Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2022: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे खास Quotes)
हॅलोविन फेस्टीव्हलमध्ये (Halloween Festival) विविध खेळ खेळणे, हॅलोविन कॉकटेल (Halloween Cocktail) पिने आणि पार्टी करत हॅलोविन साजरा करण्यात येतो. हॅलोविन कॉकटेल यूएसए (USA) मध्ये 1950 च्या दशकात अत्यंत लोकप्रिय झाला. तसेच गेले काही वर्षात भारतातील देखील काही प्रमुख शहरात हॅलोविन पार्टी (Halloween Party) साजरी करण्यात येतो.