September 2024 Festival Calendar: हरतालिका तीज, गणेश उत्सव, पितृ पक्ष कधी कधी आहे? पहा सप्टेंबर महिन्यातील सणांची संपूर्ण यादी

याशिवाय गणेशोत्सव आणि पितृ पक्षही याच महिन्यात येणार आहेत.

September 2024 Festival Calendar (फोटो सौजन्य - File Image)

September 2024 Festival Calendar: सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे होणार आहेत. ललिता सप्तमी (Lalita Saptami), राधा अष्टमी (Radha Ashtami), विश्वकर्मा पूजा (Vishwakarma Puja) आणि इंदिरा एकादशी (Indira Ekadashi), हरितालिका तीज (Haritalika Teej) यासारखे प्रमुख उपवास आणि सण सप्टेंबर 2024 मध्ये साजरे करण्यात येणार आहेत. याशिवाय गणेशोत्सव आणि पितृ पक्षही याच महिन्यात येणार आहेत.

तसेच भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना होईल. 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्यात येईल. त्यानंतर पितृ पक्ष सुरू होईल जो पुढील महिन्यात 3 ऑक्टोबरपर्यंत चालेल. सप्टेंबर 2024 मधील सर्व उपवास आणि सणांची यादी पहा. (हेही वाचा - Banjara Teej 2024: मोठ्या उत्साहात पार पडला बंजारा तीज महोत्सव (Watch Video))

सप्टेंबर 2024 मधील सणांची यादी -

1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर - राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024

2 सप्टेंबर- जागतिक नारळ दिन, भाद्रपद अमावस्या

5 सप्टेंबर- राष्ट्रीय शिक्षक दिन

6 सप्टेंबर- हरतालिका तीज व्रत

दुसऱ्या आठवड्यात गणेश चतुर्थी -

7 सप्टेंबर- गणेश चतुर्थी

8 सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, जागतिक फिजिओथेरपी दिन

9 सप्टेंबर - हिमालय दिवस

10 सप्टेंबर - जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (WSPD)

तिसऱ्या आठवड्यात हिंदी दिवस

14 सप्टेंबर- हिंदी दिवस

15 सप्टेंबर- राष्ट्रीय अभियंता दिन

16 सप्टेंबर - जागतिक ओझोन दिवस

17 सप्टेंबर- अनंत चतुर्दशी, विश्वकर्मा पूजा

21 सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, जागतिक अल्झायमर दिवस, आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस, संकष्टी चतुर्दशी

जागरूकता सप्ताह

22 सप्टेंबर - कर्करोग रुग्ण कल्याण दिन, जागतिक गेंडा दिवस

23 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस

24 सप्टेंबर - जागतिक नदी दिन

25 सप्टेंबर- जागतिक फार्मासिस्ट दिन, अंत्योदय दिवस

26 सप्टेंबर- जागतिक गर्भनिरोधक दिन, जागतिक पर्यावरण आरोग्य दिन

पर्यटन आणि हार्ट डे ने सप्ताह -

27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन

28 सप्टेंबर - जागतिक रेबीज दिवस

29 सप्टेंबर - जागतिक हृदय दिन

20 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन

वर दिलेल्या सणांची यादी पाहून तुम्ही या महिन्यात येणाऱ्या सणांसाठी लागणारी तयारी करू शकता. गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या सर्वत्र बाजारपेठा सजल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif