Independence Day 2023: तिरंगा फडकवताना आणि उतरवताना लक्षात ठेवा 'हे' नियम; काय आहे भारतीय ध्वज संहिता? जाणून घ्या

सूर्यास्ताच्या आधी ध्वज फडकावायला हवा. तिरंगा फडकावण्यासोबतच तो उतरवताना विशेष काळजी घ्यावी. जो तिरंगा वापरला जात आहे तो कुठेही फाटलेला नसावा. तसेच तो स्वच्छ असावा.

Indian national flag (File and Representative Image)

Independence Day 2023: यंदा भारत 77 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिन हा एक प्रकारचा राष्ट्रीय सणचं आहे. या उत्सवाची तयारी मोठ्या थाटामाटात केली जात आहे. 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे याशिवाय सरकारी इमारती, खाजगी कार्यालये इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो. याबाबत भारत सरकारने नियम बनवले आहेत. या संदर्भात, 2002 मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू करण्यात आली.

तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का?

नियमांनुसार ध्वजारोहणासाठी या नियमांचे पालन करू शकतील अशा व्यक्तीची निवड करावी. सूर्यास्ताच्या आधी ध्वज फडकावायला हवा. तिरंगा फडकावण्यासोबतच तो उतरवताना विशेष काळजी घ्यावी. जो तिरंगा वापरला जात आहे तो कुठेही फाटलेला नसावा. तसेच तो स्वच्छ असावा. (हेही वाचा - Independence Day 2023: 'हर घर तिरंगा' मोहीमेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनापूर्वी पोस्ट ऑफिस राष्ट्रीय ध्वजाची करणार विक्री)

भारतीय ध्वज संहिता काय आहे?

2002 मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू होण्यापूर्वी 26 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी सामान्य लोक तिरंगा फडकावत होते. मात्र, आता तुम्ही देखील भारतीय ध्वज संहिता 2002 मर्यादित पद्धतीने आणि नियमांनुसार तिरंगा फडकवू शकता. ध्वज फडकवल्यानंतर ध्वज उतरवतानाही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif