Akshaya Tritiya 2025: गेल्या 10 वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव किती होता? जाणून घ्या
सोने खरेदी करणे हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही. लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. आपल्या देशात फक्त काही सण, लग्न किंवा शुभ प्रसंगीच जास्त सोने खरेदी केले जाते. आज आपण अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती जाणून घेऊयात.
Akshaya Tritiya 2025: अनेक महिलांना सोने (Gold) खरेदी करणं खूप आवडते. सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. भारतात सोने खरेदी करणे हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही. लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. आपल्या देशात फक्त काही सण, लग्न किंवा शुभ प्रसंगीच जास्त सोने खरेदी केले जाते. अशा प्रसंगी, मागणीनुसार, सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येते. दरवर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होत आहे. म्हणजेच त्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
व्हेंचुराच्या मते, 10 मे 2024 पर्यंत सोने खरेदीमध्ये 30 टक्के वाढ झाली आहे. यावरील परतावा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आज आपण अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती (Last 10 years Gold Price On Akshaya Tritiya) जाणून घेऊयात. ज्याद्वारे आपण अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी सोन्यावरील परतावा, महागाई, वाढती किंमत याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. (हेही वाचा - (हेही वाचा - Akshaya Tritiya 2025 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त आणि तारीख घ्या जाणून)
10 वर्षात सोन्याचा भाव किती होता?
खालील आकडे व्हेंचुराच्या अहवालातून घेतले आहेत. येथे आपण 24 कॅरेट सोन्याची किंमत घेतली आहे. 24 कॅरेट सोन्यामध्ये 99.9 टक्के सोने असते, तर उर्वरित इतर धातूंचे मिश्रण असते. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्त्व? जाणून घ्या?)
(वर्ष) (24 कॅरेट सोने)
2015 26,936
2016 29,805
2017 28,873
2018 31,534
2019 31,729
2020 46,527
2021 47,676
2022 50,808
2023 59,845
2024 73,240
2025 95,900
जर आपण 2015 पासून आतापर्यंतच्या सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर प्रति 10 ग्रॅम 68,964 रुपयांचा फरक आहे. यासोबतच, गेल्या 5 वर्षांचा फरक पाहिला तर तो प्रति 10 ग्रॅम 49,373 रुपये आहे. आज सकाळी 10.38 वाजता एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 95,000 रुपये आहे. एमसीएक्सवर सोन्याने आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 95010 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.
अक्षय्य तृतीयेला भौतिक सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण या शुभ प्रसंगी तुम्ही डिजिटल सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिजिटल सोने खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, तुम्हाला PhonePe वरून डिजिटल सोने खरेदी केल्यावर 1% कॅशबॅक मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)