Vivah Shubh Muhurat December 2019: डिसेंबर महिन्यात हे आहेत लग्नाचे शुभमुहूर्त, जाणून घ्या सविस्तर

यात आपले सर्व नातेवाईक, मित्रमंडळी लग्नाला यावी यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात ती रविवारचा मुहूर्त मिळावा यासाठी.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

Wedding 2019: लग्नासाठी सर्वात चांगला सीझन म्हणजे हिवाळा. दरवर्षी सर्वात जास्त लग्न ही हिवाळ्यातच होतात. यात बरेच लोक डिसेंबर महिन्यात लग्न करणे पसंत करतात. कारण सध्या लग्न सोहळ्याइतकेच हनिमून, देवदर्शन या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. डिसेंबर महिन्यात थंडी असल्या कारणाने लग्नासह अन्य धार्मिक कार्यक्रम करणेही जोडप्यांना बरे वाटते. तसेच या महिन्यात उन्हाळ्याचा त्रास किंवा पावसाची कटकट नसल्यामुळे पाहुणेही अगदी आनंदाने लग्नसोहळ्याला उपस्थित राहतात. त्यामुळे लग्नासाठी या महिन्यातील शुभमुहूर्त मिळावा यासाठी अनेकांचे लक्ष्य असते.

डिसेंबर महिन्यात कधी कधी मुहूर्त जास्त असतात तर कधी कमी. यात आपले सर्व नातेवाईक, मित्रमंडळी लग्नाला यावी यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात ती रविवारचा मुहूर्त मिळावा यासाठी.

हेदेखील वाचा- Winter Wedding Fashion Tips: थंडीच्या सीझन मधील लग्नासाठी Warm & Stylish लूक साकारायला मदत करतील 'या' फॅशन टिप्स

चला तर पाहूयात डिसेंबर महिन्यातील शुभमुहूर्त:

1) 5 डिसेंबर (गुरुवार)

2) 6 डिसेंबर (शुक्रवार)

3) 7 डिसेंबर (शनिवार)

4) 11 डिसेंबर (बुधवार)

5) 12 डिसेंबर (गुरुवार)

हे मुहूर्त पाहता लग्नघरासाठी डिसेंबर महिन्यात थोडक्यात रविवारचा मुहूर्त हुकला आहे असच म्हणावे लागेल. असे असले तरीही लग्न शुभमुहूर्तावर होणे महत्त्वाचे. नाही का?



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif