Vitthal Rukmini Images, HD Wallpapers for Free Download Online: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीचं विलोभनीय रूप शेअर करत साजरी करा आजची देवशयनी एकादशी!
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू नीद्रेतून जागे होण्यापूर्वी त्यांची पूर्ण विधींसह पूजा केली जाते.
आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस हा विठूभक्तांसाठी खास दिवस आहे. हा दिवस देवशयनी एकादशी म्हणून देखील साजरा केला जातो. वारकरी मंडळी पालखींसोबत पायी वारी करत पंढरपूरात दाखल होतात. विठ्ठल रूक्मिणीचं रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी अनेक भाविक दरवर्षी पायी वारी करतात. अनेक विठूभक्त आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवास, व्रत वैकल्यं करतात. मग तुमच्या अशा विठूभक्त मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आजचा दिवस थोडा स्पेशल करू शकता. सोशल मीडीयात WhatsApp, Facebook, Instagram, X, च्या माध्यमातूनही तुम्ही विठू माऊलीचे फोटो शेअर करू शकता.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि पद्मनाभा एकादशी नावाने सुद्धा ओळखले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु याांचा शयन काळासा प्रारंभ होतो. या चार महिन्यांच्या दिवसात ते समुद्रात निद्रा घेतात. Ashadhi Ekadashi 2024 HD Images In Marathi: आषाढी एकादशी निमित्त खास Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.
विठू माऊलीचं विलोभनीय रूप
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू नीद्रेतून जागे होण्यापूर्वी त्यांची पूर्ण विधींसह पूजा केली जाते. या दिवशी उपवास ठेवून भगवान विष्णू यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यांना पिवळ्या रंगाची वस्रे, पिवळे चंदन आणि पिवळी मिठाईसह फळांचा नैवेद्य दाखवावा. त्यांच्या पूजनावेळी तुळची पानांचा जरुर वापर करा. नाहीतर पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही. या दिवशी रात्री भगवान विष्णू यांचे भजन करावे. तर दुसऱ्या दिवशी सुर्योदयानंतर ब्राम्हणांना भोजनासाठी बोलवावे.