Vishwa Poha Diwas: 'विश्व पोहा दिवस' च्या निमित्ताने आज कांदे पोहे च्या सोबतीनेच दडपे पोहे ते इंदुरी पोहे अशा विविध प्रकरांची इथे पहा रेसिपी (Watch Video)
दडपे पोहे ते इंदुरी पोहे पहा कांदेपोह्यांना काय आहेत तितकेच चविष्ट पर्याय...
भारतीयांच्या नाश्त्याच्या पदार्थांपैकी आवडीच्या एका पदार्थांमध्ये पोहा (Poha) हा पदार्थ हमखास केला जातो. सकाळ-संध्याकाळ नाश्त्याला कधीही झटपट करता येईल असा एक पदार्थ म्हणजे कांदेपोहे (Kande Pohe). 2015 सालपासून 7 जून हा दिवस पोहा दिन किंवा विश्व पोहा दिवस (Vishwa Poha Diwas) म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. दरम्यान या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील नेमकं कारण किंवा कोणी, कसा आणि का सुरू केला याची ठोस माहिती नाही पण आजकाल झटपट आणि इन्स्टंट फूडच्या जमान्यात पोह्यांसाठी खवय्यांची असलेली विशेष आवड अजूनही टिकून आहे. महाराष्ट्रासह भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे केले जातात. मग तुम्ही देखील पोह्यांचे दर्दी असाल तर या पोहा डे (World Poha Day) च्या निमित्ताने त्याच्या विविध चवी, बनवण्याच्या पद्धती आज नक्की जाणून घ्या. (नक्की वाचा: पोहे खाऊन वजन कमी होते? कसं ते जाणून घ्या).
कांदे पोहे
बटाटे पोहे
दडपे पोहे
तर्री पोहे
इंदुरी पोहे
पोह्यांमध्ये आवडीनुसार भाज्या घातल्याने तो एक पोषक आहार देखील होतो आणि दिवसाच्या सुरूवातीला असा पदार्थ खाणं आरोग्यदायी पर्याय देखील आहे. या भाज्यांमुळे पोह्यातून व्हिटामिन,मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते. दरम्यान भाज्यांना कडधान्य, सोयाबीन,शेंगदाणे किंवा उकडलेले अंड यांचादेखील पर्याय दिल्यास प्रोटीन्सची मात्रा वाढते. पोह्यांची पोषकता वाढण्यासाठी पांढर्या पोह्यांऐवजी लाल पोहे (हातसडीचे) देखील वापरले जातात.