Vinoba Bhave Birth Anniversary: आचार्य विनोबा भावे जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांकडून आदरांजली

विनोबा भावे (Vinoba Bhave) यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले आहे.

Vinoba Bhave | (Photo Credit: Twitter/PMO)

आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती (Vinoba Bhave Birth Anniversary). विनोबा भावे (Vinoba Bhave) यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले आहे. विनोभा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. मात्र, आपल्या कार्यामुळे ते आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध झाले. 11 सप्टेंबर 1885 रोजी त्यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आणि भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधी यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी 1940 मध्ये पुकारलेल्या 'वैयक्तिक सत्याग्रह' लढ्यात आचार्य विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. 'भारत छोडो' आंदोलनातही विनोबा भावे अग्रेसर होते.

आचार्य विनोबा भावे यांना मान्यवरांकडून आदरांजली

ट्विट

(हेही वाचा, Teachers’ Day 2021 in India: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षक दिन नेमका संबंध काय? जाणून घ्या ​इतिहास, वैशिष्ट आणि महत्त्व)

ट्विट

ट्विट

विनोबा भावे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. आपल्या सामाजिक कार्यासोबतच त्यांनी विपूल लेखणही केले. , अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई, गीताई-चिंतनिका, गीता प्रवचने, गुरुबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, मधुकर, मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी), लोकनीती, विचार पोथी, साम्यसूत्र वृत्ति, साम्यसूत्रे, स्थितप्रज्ञ-दर्शन ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.