Vasubaras Wishes In Marathi: 33 कोटी देव सामावलेल्या गोमातेबाबत आदर व्यक्त करणारे HD Greeting, What's App Status, Quotes शेअर करत द्या वसुबारसेच्या अनोख्या शुभेच्छा

वसुबारशीच्या दिवशी गोधनाची पुजा केली जाते. या मंगलमय दिवसाच्या डिजीटल शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.

हिंदु धर्मात गोमातेला विशेष महत्व आहे. 33 कोटी देव गोमातेत सामावलेले आहेत अशी आख्यायिका आहे. या गोमातेची, गोधनाची पुजा करणारा दिवस म्हणजेचं वसुबारस. वसुबारशीच्या दिवशी गोधनाची पुजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जातेत्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. काही भागात दिवळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारसेला विशेष महत्व आहे.या दिवसापासून घरासमोर संध्याकाळी रांगोळी काढण्यास आणि दिव्याची रोषणाई करण्यास सुरुवात करतात. या दिवशी स्त्रियांचं विशेष व्रत असतं.  दिवशी गहूमूग खात आहारात न घेता स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावेआपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे यासाठी वसुबारशीचा उपावास केल्या जातो. 

 

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!

 

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !

आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या

आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

 

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,

दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,

व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,

गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,

आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

 

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..

परमपुज्य जी वंद्य या भारताला,

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,

गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!