Vasu Baras 2024: वसू बारस सणाचे महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
यावर्षी 28 ऑक्टोबर 2024 रोजी गोवत्स द्वादशी हा सण साजरा होत आहे. हा सण महाराष्ट्रात गोवत्स द्वादशीला वसु बारस, गुजरातमध्ये वाघ बारस किंवा बच बारस म्हणून ओळखला जातो.
Vasu Baras 2024: पाच दिवसीय दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते, तर त्याच्या एक दिवस आधी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी 28 ऑक्टोबर 2024 रोजी गोवत्स द्वादशी हा सण साजरा होत आहे. हा सण महाराष्ट्रात गोवत्स द्वादशीला वसु बारस, गुजरातमध्ये वाघ बारस किंवा बच बारस म्हणून ओळखला जातो, तर आंध्र प्रदेशात श्रीपाद श्री वल्लभ हा सण श्रीपाद वल्लभ आराधना उत्सव म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, सर्व देवी-देवता गाईमध्ये वास करतात, म्हणून गायीची पूजा केली जाते. श्रीकृष्ण स्वतः गाईची सेवा करायचे, कारण त्यांना गाई खूप आवडत असे . गायची भक्ती आणि गो सेवेपेक्षा मोठी सेवा कोणतीही नाही असे म्हणतात.
वसू बारस 2024: तारीख आणि वेळ
द्वादशी तिथीची सुरुवात - 28 ऑक्टोबर, 07:50 सकाळी ते द्वादशी तिथी समाप्त - ऑक्टोबर 29 10:31 सकाळी
गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी गायी व वासरु यांची विशेष पूजा करून त्यांचा आदर केला जातो. या दिवशी हरभरा, अंकुरलेले मूग अशा अनेक गोष्टी गाईला नैवेद्य म्हणून खाऊ घातले जातात.
वसू बारस सणाचे महत्व
भविष्य पुराणानुसार ब्रह्मा गाईच्या पाठीमागे, विष्णू गळ्यात, रुद्र मुखात, सर्व देवी-देवता पोटात, अनंत नाग शेपटीत, सर्व पर्वत खुरांमध्ये आहेत, सूर्य चंद्र डोळ्यात आहेत, सर्व पवित्र वस्तू गोमूत्रात आहेत ते नद्यांचे निवासस्थान मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून सेवा केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. प्रचलित समजुतीनुसार, माता गाईची पूजा केल्याने केवळ देवी-देवता प्रसन्न होत नाहीत तर पितरांचे आशीर्वाद देखील मिळतात, म्हणून गोवत्स द्वादशीला गाईची पूजा करून मातेचा आदर दर्शविला जातो.