Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या
पण, ज्यांच्या प्रेमोचा समोरच्याकडून स्वीकार केला जात नाही त्यांचे काय? तुम्हालाच समोरच्याने तुमचा प्रेमाचा स्वीकार अर्थातच प्रपोज स्वीकारायला नकार दिला तर? होय, असे घडू शकते. पण, असे घडले म्हणून गांगरुन जाण्याची मुळीच गरज नाही. प्रेमात मिळालेला नकार कसा स्वीकाराल? घ्या जाणून.
व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) अनेकांसाठी अनेक स्वप्नं आणि नव्या आशा घेऊन येतो. व्हॅलेंटाईन वीकच्या 7 ते 14 फेब्रुवारी या काळात खास करुन व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) ला अनेक जोडपी नव्याने जन्म घेतात. म्हणजेच एकमेकांप्रती असलेल्या आपल्या प्रेमाचा उपहार ते परस्परांना देतात. ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ होते. ते एकमेकांना प्रपोज करतात. जे एकमेकांचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारतात त्यांच्या आनंदाला पारावर राहात नाही. पण, ज्यांच्या प्रेमोचा समोरच्याकडून स्वीकार केला जात नाही त्यांचे काय? इतरांचे कशाला? तुम्हालाच समोरच्याने तुमचा प्रेमाचा स्वीकार अर्थातच प्रपोज स्वीकारायला नकार दिला तर? होय, असे घडू शकते. पण, असे घडले म्हणून गांगरुन जाण्याची मुळीच गरज नाही. प्रेमात मिळालेला नकार कसा स्वीकाराल? घ्या जाणून.
लक्षात ठेवा नकार स्वीकारणे आपल्यासाठी कदाचित कठीण असू शकते. परंतू, हे लक्षात ठेवा, प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जर कोणी तुमचा प्रस्ताव नाकारला तर तो स्वीकारा. उमदेपणा दाखवा. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीनुसार जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीचा निर्णय स्वीकारणे आणि त्यांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. आपल्याप्रती असलेला समोरच्याचा निर्णय नाकारणे आणि आपला निर्णय, प्रपोजल समोरच्याने स्वीकारावे हा अट्टाहास तुमच्या व्यक्तीमत्वाच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. (हेही वाचा, Valentine’s Day 2023 Gift Ideas: जोडीदाराला द्या हटके गिफ्ट, दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाईन डे)
शक्य असल्यास संवाद करा. समोरच्याने तुमचा प्रस्ताव का नाकारला याबद्दल समोरच्याकडून जाणून घेतले तर ते अधिक योग्य ठरेल. असा संवाद तुम्हाला समोरच्याचा दृष्टीकोन समजून घेण्यास आणि कोणतेही गैरसमज टाळण्यास मदत करू शकते.
नकार पचविणे भावनिकदृष्ट्या कठीण असू शकते. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःला सावरण्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपलया भावना मित्र अथवा अगदी जवळच्या व्यक्ती, नातेवाईक, आप्तेष्ठ यांसोबत शेअर करा. मनोरंजन अथवा तुमचे मन रमेल अशा विषय, कृती यांमध्ये स्वताला व्यग्र ठेवा.
नकार स्वीकारा. पुढे चला. त्या विषयावर अडून राऊ नका. समोरचा व्यक्ती तुम्हाला स्वीकारत नसेल तर त्याचा आदर करा. असे अशू शकते. आयुष्यात असे प्रसंग येऊ शकतात. भविष्यात तुम्ही स्वत:वर इतके काम कराल की जेणेकरुन समोरची व्यक्ती स्वत: तुमच्या प्रेमात पडेल इतकी मेहनत घेण्याची तयारी ठेऊन कामाला लागा. आयुष्यात एकाच गोष्टीत बरेच काही सामावलेले असत नाही. नव्या क्षणांसोबत अनेक नव्या गोष्टी घडत असतात. त्याचाही स्वीकार करा.
लक्षात ठेवा, नकार हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. हे असे काहीतरी आहे जे आपण सर्वजण कधीतरी अनुभवतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे प्रसंग सन्मानाने खिलाडू वृत्तीने हाताळा. स्वत:ला सावरा. सांभाळा. एक नकार म्हणजे आयुष्य नसते. कदाचित तुमच्यासाठी त्याहूनही अधिक चांगली व्यक्ती, संधी तुमची वाट पाहात असेल. त्यामुळेच नियतीने तुमच्यासोबत असे काही घडवलेले असू शकते.