Valentine's Day 2019: 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी 'स्मार्ट' पद्धतीने गिफ्ट खरेदी करा, किंमत फक्त 1000 रुपयांपेक्षा कमी
तर प्रत्येक प्रेमवीरांमध्ये आपल्या पार्टनरसाठी काहीतरी खास गिफ्ट किंवा सेलिब्रेशन करायची तयारी सुरुच झाली असेल. तसेच व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील सातवा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी हा 'व्हेलेंटाईन डे' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन डे (Valentine Day) अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचला आहे. तर प्रत्येक प्रेमवीरांमध्ये आपल्या पार्टनरसाठी काहीतरी खास गिफ्ट किंवा सेलिब्रेशन करायची तयारी सुरुच झाली असेल. तसेच व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील सातवा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी हा 'व्हेलेंटाईन डे' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यावेळी प्रत्येक प्रेमवीर आपल्या जोडीसाठी खास गिफ्ट एमेकांना देऊन या दिवसाच्या शुभेच्छा देतात.
मात्र जर तुम्हाला यंदाच्या व्हेलेंटाईन डे दिवशी तुमच्या पार्टनरला स्मार्ट आणि खास गिफ्ट द्यायचे असेल तर या स्मार्ट वस्तू नक्कीच खरेदी करा. तसेच सध्याच्या स्मार्ट तरुणाईसाठी ही 1000 रुपांपेक्षा कमी किंमतीतील ही स्मार्ट गिफ्ट खुपच आवडतील.
SYL SW-211 फोन स्मार्टवॉच
हे स्मार्टवॉच तुम्हाला फ्लिपकार्ट वरुन खरेदी करता येणार आहे. तसेच या स्मार्टफोनसाठी कॉलिंग, टच स्क्रिन सुविधा मिळणार आहे. तर चार्च करण्यासारखे हे वॉच असल्याने त्यासाठी वारंवार बॅटरी बदलता येणार नाही. यामध्ये कॅलेंडर, रिमांडर नोटिफिकेशन सारखे फिचर्स उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनसाठी 4.5 स्टार देण्यात आले आहे. तर किंमत फक्त 761 रुपये ठेवण्यात आली आहे.
Amgen 4G phone स्मार्टवॉच
अमेगनचे स्मार्टवॉच तुम्हाला फक्त 685 रुपयात खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये कॉलिंग फिचर्स देण्यात आले आहे. तसेच युनिसेक्स पद्धतीचे हे स्मार्टवॉच असल्याने कोणही सहजपणे वापरु शकतात. तर फ्लिपकार्टवर या स्मार्टवॉचला 3.9 स्टार देण्यात आले आहे. तसेच अॅन्ड्रॉईड आणि आयफोन धारकांसाठी हे स्मार्टवॉच वापरु शकणार आहे.
ALONZO Dz09 ब्लॅक स्मार्टवॉच
या स्मार्टवॉचची किंमत फक्त 620 रुपये एवढी आहे. तसेच युनिसेक्स स्मार्टवॉच असून फ्लिपकार्टवरुन तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे. तर 3.4 स्टार फ्लिपकार्टवर देण्यात आले आहेत.
यंदाच्या व्हेलेंटाईन डे दिवशी या स्मार्टपद्धतीने खरेदी करुन प्रियकराला खुश करा. तसेच आयुष्यभरासाठी दिलेली वचने पाळत नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा.