युपी मधील 'या' गावात करवा चौथ व्रत तर दूरच, शृंगार पण करत नाहीत विवाहित महिला
चंद्र दिसल्यावर विवाहित महिला अर्घ्य देणार आहेत. परंतु युपी (UP) मधील एका गावत करवा चौथ तर दूरच साधा शृंगारपण करत नाहीत. उत्तर प्रदेशातील जनपद मथुराच्या कस्बा सुरीर मधील आहे
करवा चौथ व्रत (Karva Chauth) आज (17 ऑक्टोबर) देशभरात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. चंद्र दिसल्यावर विवाहित महिला अर्घ्य देणार आहेत. परंतु युपी (UP) मधील एका गावत करवा चौथ तर दूरच साधा शृंगारपण करत नाहीत. उत्तर प्रदेशातील जनपद मथुराच्या कस्बा सुरीर मधील आहे. येथे पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत टाळण्यासाठी एक प्रथा शेकडो परंपरेनुसार चालत आली आहे. खरतर सतीच्या श्रापाच्या भयामुळेच येथे करवा चौथ साजरी केली जात नाही.
सुरीर मधील मोहल्ला वघा ठाकुर समाजात शेकडो परिवार करवा चौथ आणि अहोई अष्ठमी साजरा केल्यास सतीचा श्राप मिळतो अशी येथे मान्यता आहे. करवाचौथ उपवास न ठेवल्यामुळे या समाजातील नवविवाहित जोडप्यांना बर्याचदा त्रास होतो. तर स्थानिक महिला पूजा हिने असे सांगितले की, तिच्या मनात अशी इच्छा होती की लग्नानंतर करवा चौथ व्रत करणार पण सासरी आल्यानंतर सतीच्या श्रापाची कथा ऐकवल्यावर ती करु शकत नाही.कस्बा सुरीर मध्ये सतीची पूजा एका देवी प्रमाणे होते. येथे विवाह किंवा तीज सणाला सती मंदिरात येऊन पूजा अर्चना केली जाते. सतीचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण मोठ्या श्रद्धेने गर्दी करताना दिसून येतात.(Karva Chauth Chand Time 2019: मुंबई, पुणे मध्ये आज करवा चौथ चांद किती वाजता दिसणार? पहा चंंद्रोदयाच्या वेळा)
करवा चौथ दिवशी भारतीय परंपरेनुसार, उपासकरी महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात. हा उपवास सोडण्याकरिता चंद्राला चाळणीतून पाहून त्यानंतर पतीचा चेहरा पाहिला जातो. त्याच औक्षण केलं जातं. पती पत्नीला याच्या बदल्यात छानसं गिफ्ट देतो. तर पाणी आणि जेवणाचा घास भरवून तिचा उपवास मोडला जातो.